Monday , December 8 2025
Breaking News

बिदरमध्ये सशस्त्र दरोडेखोरांकडून दोन सुरक्षा रक्षकांची हत्या

Spread the love

 

एटीएमसाठी आणलेली ९३ लाखांची रोकडही लुटली

बंगळूर : बिदरच्या जिल्हा मुख्यालयातील एसबीआय एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली ९३ लाखांची रोकड पळवण्यापूर्वी दुचाकीवरून आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी गुरुवारी दोन सुरक्षा रक्षकांची गोळ्या झाडून हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सुरक्षा एजन्सीचे तीन कर्मचारी एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी सकाळी १०.३० वाजता जिल्हा न्यायालय शिवाजी नगरजवळ असलेल्या एसबीआयच्या मुख्य शाखेत असलेल्या एटीएममध्ये आले. एटीएममध्ये चलनी नोटांनी भरलेली ट्रंक घेऊन जात असताना दोन मुखवटा घातलेले लोक दुचाकीवरून आले आणि त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर मिरची पूड फेकली. एका दरोडेखोराने सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला, त्यात दोघे जखमी झाले. एक गार्ड जागीच कोसळला तर दुसरा रक्षक गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला.
दरोडेखोरांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर सहा राऊंड गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. दरोडेखोरांनी त्यांच्या दुचाकीवरून खाली उतरून चलनी नोटांनी भरलेली ट्रंक उचलून त्यांच्या दुचाकीवर टाकण्याचा प्रयत्न केला असता पेटी व ट्रंक घेऊन जाणारा दरोडेखोर खाली पडला. त्याने उभे राहून ट्रंक उचलली आणि घटनास्थळावरून दुचाकीवरून पळ काढला. ट्रंकमध्ये किती रक्कम होती हे कळू शकलेले नाही.
घटनास्थळी जमलेल्या शेकडो लोकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवण्यात रस दाखवला तरी गोळ्यांचा बळी जाण्याच्या भीतीने कोणीही घटना थांबवण्याचे धाडस केले नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही सर्व घटना अवघ्या दहा मिनिटांत संपली आणि शेकडो लोकांच्या समोर दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. बिदरचे एसपी प्रदीप गुंटे यांनी घटनास्थळी येऊन दरोडेखोरांना पकडण्याच्या सूचना दिल्या.
गिरी रा. व्यंकटेश (वय ४२) असे मृत व्यक्तीचे नाव असून, इतर सुरक्षा कर्मचारी शिवकुमार (वय ३५) यांना गोळी लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. शिवकुमार यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत गाडीचा चालक राजशेखर बचावला आहे. एटीएममध्ये रक्कम जमा करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकड बंदुक नसल्याचेही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
बिदरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत पुजारी यांनी माध्यमाच्या प्रतिनिधीना सांगितले की, या गुन्ह्याचा सर्व बाजूंनी अभ्यास करण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून पोलीस आरोपींचा शोध घेण्यासाठी सर्व घटनास्थळी भेट देणार आहेत. तेलंगणाची ठिकाणे बिदरपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असल्याने दरोडेखोर तेलंगणात पळून जाण्याची शक्यता त्यांनी नाकारली नाही.
बिदर जिल्ह्याचे प्रभारी मंत्री ईश्वर खांड्रे यांनी ही घटना गृहमंत्री परमेश्वर आणि मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून योग्य चौकशीची विनंती करणार असल्याचे सांगितले. मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे खांड्रे म्हणाले.
बिदर : गिरी व्यंकटेश आणि शिवा काशिनाथ अशी मृतांची ओळख पटली आहे. ते सीएमएस एजन्सीचे कर्मचारी होते.
सकाळी ११.३० वाजता कर्मचारी गर्दीच्या शिवाजी चौकात असलेल्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आले होते, असे त्यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी गुन्हा करण्यासाठी आठ राउंड फायर केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आजूबाजूचे सर्व रस्ते बॅरिकेड लाऊन बंद केले.
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *