Sunday , December 7 2025
Breaking News

देशातील दुसऱ्या सर्वात लांब पुलाच्या उद्घाटनाला राजकीय रंग

Spread the love

 

अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/



सिगंदूर पुलाचे गडकीरीनी केले उद्घाटन: मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती

बंगळूर : संततधार पाऊस असूनही, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दुपारी सागर तालुक्यातील अंबरगोडलू-कलासवल्ली दरम्यान शरावती बॅकवॉटरवर बांधलेल्या भारतातील दुसऱ्या सर्वात लांब केबल-स्टेड पुलाचे उद्घाटन केले.
या कार्यक्रमाला भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित असले तरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या किंवा त्यांचे कोणतेही मंत्री उपस्थित नव्हते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुलाचा उद्घाटन समारंभ पुढे ढकलण्याची विनंती केली होती, कारण त्यांना आगाऊ माहिती देण्यात आली नव्हती, तरीही गडकरींनी सागर तालुक्यातील बारगोडलू-कलासवल्ली दरम्यान शरावती बॅकवॉटरवर बांधलेल्या पुलाचे उद्घाटन केले आणि सोमवारी पावसाचा सामना करत पुलावर पूजा केली.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, खासदार बी. वाय. राघवेंद्र, आमदार अरग ज्ञानेंद्र, एस. एन. चन्नबसप्पा, डी. एस. अरुण, माजी मंत्री कागोडू थिम्मप्पा, हरतालू हलप्पा आणि इतर अनेकजण उपस्थित होते.
अधिकाऱ्यांच्या मते, सागर तालुक्यातील अंबरगोडलू-कलासवल्ली दरम्यान शरावती बॅकवॉटरवर ४७२ कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल २.४४ किमी लांब आणि १६ मीटर रुंद आहे. या पुलामुळे सागरपासून सिगंदूरच्या आसपासच्या गावांपर्यंतचे अंतर कमी होईल.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून म्हटले आहे की, सागर-सिगंदूर पुलाच्या उद्घाटन समारंभासाठी त्यांना उशिरा आमंत्रित करण्यात आले आणि त्यांचे इतरत्र इतर कार्यक्रम नियोजित असल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.
केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक विभागाने अशा राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यापूर्वी राज्य सरकारशी आधीच संपर्क साधला असता तर ते अधिक योग्य झाले असते. भविष्यात असे कार्यक्रम आयोजित करताना महामार्ग आणि रस्ते वाहतूक विभागाला वेळेवर राज्य सरकारशी संपर्क साधण्याचे निर्देश द्यावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्याचे गडकरीना पत्र
शिमोगा जिल्ह्यातील सागर येथील सिगंदूर पुलाच्या उद्घाटनापूर्वीच राजकीय वाद सुरू झाला आहे. आम्ही या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.
सागर-सिगंदूर पुलाच्या उद्घाटन समारंभासाठी मला उशिरा आमंत्रित करण्यात आले, इतरत्र पूर्व नियोजित कार्यक्रम असल्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
मला याबद्दल आधीच माहिती न मिळाल्याने, माझ्या अध्यक्षतेखाली विजयपुर जिल्ह्यातील इंडी तालुक्यात अनेक विकास कामे आधीच हाती घेण्यात आली आहेत. केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक विभागाने अशा राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यापूर्वी राज्य सरकारशी संपर्क साधला असता तर ते अधिक योग्य झाले असते. भविष्यात असे कार्यक्रम आयोजित करताना महामार्ग आणि रस्ते वाहतूक विभागाला वेळेवर राज्य सरकारशी संपर्क साधण्याचे निर्देश द्यावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो, असे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी पत्रात लिहिले आहे.
“मी तुम्हाला विनंती करतो की आजचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा आणि तुमच्यासाठी सोयीस्कर असलेल्या काही तारखा मला द्या. अशा प्रकारे, मी अशा महत्त्वाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात सहभागी होऊ शकेन,” असे ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

नवहिंद सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी सायनेकर तर व्हा. चेअरमनपदी अनिल हुंदरे यांची निवड

Spread the love  येळ्ळूर : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *