
बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज सहकार विभागाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर कृषी कर्ज वाटप सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. राज्यात 37 लाख शेतकऱ्यांना 28 हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 8.69 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 8,362 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
नुकसानग्रस्त दूध उत्पादक संस्थांचे पुनरुज्जीवन करणे, 529 रिक्त पदे भरणे आणि अनधिकृत सावकारी तसेच चिटफंड कंपन्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली ‘कृष्णा’ येथे सहकार विभागाच्या प्रगतीची आढावा बैठक झाली. या आर्थिक वर्षात 37 लाख शेतकऱ्यांना 28 हजार कोटी रुपयांचे कृषी कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. जुलै अखेरपर्यंत 8.69 लाख शेतकऱ्यांना 8,362 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. नाबार्डच्या सवलतीच्या व्याजदराच्या कर्ज मर्यादेत 42.21 टक्के कपात होऊनही, कर्ज वाटपात 96.07 टक्के यश मिळाले आहे.राज्यात 28,516 सहकारी संस्था नफ्यात असून, 14,670 संस्था तोट्यात आहेत. सुमारे 2,200 दूध उत्पादक संस्था तोट्यात असून, त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सहकार विभागात 529 पदे रिक्त असून, ती भरण्यासाठीही पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, सहकारी सेवांचे संगणकीकरण आणि अनधिकृत सावकार व चिटफंड कंपन्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार बसवराज रायरेड्डी, राजकीय सचिव नसीर अहमद, अतिरिक्त मुख्य सचिव अंजुम परवेझ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta