बंगळूर : कर्नाटक परीक्षा प्राधिकरण (केईए) ने सोमवारी व्यवसाय शिक्षण प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर केल्या, कर्नाटकातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी या परीक्षा म्हणजे प्रवेशद्वार आहे.
तारखांची घोषणा करताना, उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थ नारायण म्हणाले की इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या तारखा लक्षात घेऊन वेळापत्रक निश्चित केले आहे.
१६ जून : जीवशास्त्र (सकाळी) आणि गणित (दुपारी)
१७ जून: भौतिकशास्त्र (सकाळी) आणि रसायनशास्त्र (दुपारी)
१८ जून: परराज्यातील आणि सीमाभागातील उमेदवारांसाठी कन्नड भाषा चाचणी.
सकाळी १०-३० ते ११-५० व दुपारच्या सत्रात २-३० ते ३-५० या वेळेत परीक्षा होतील. कन्नड विषयाची परीक्षा सकाळी ११-३० ते दुपारी १२-३० या वेळेत होणार आहे. इच्छुक उमेदवार केसीईटी- २०२२ साठी ५ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान ऑनलाइन अर्ज दाखल करून स्वतःची नोंदणी करू शकतात.
Check Also
एका महिन्यात शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई : मंत्री कृष्णा बैरेगौडा यांची माहिती
Spread the love बंगळूर : अतिवृष्टीमुळे १.५८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुढील एका …