Tuesday , March 3 2026
Breaking News

जमखंडी तालुक्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून चार जणांचा मृत्यू

Spread the love

 

जमखंडी : ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटून दोन वर्षाच्या मुलासह चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील कट्टेकेरे जवळ घडली. ऊस तोडण्यासाठी जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली अचानक उलटल्याने हा अपघात झाला.

मनीष पांडे (२३), हलकी पांडे (२), लक्ष्मी चिरामदी (२७) आणि रेखा भुके अशी मृतांची नावे असून सर्व मृत महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बुसा तालुक्यातील गुपावाडी येथील रहिवासी होते आणि ते ऊस तोडणीच्या कामासाठी जमखंडी परिसरात आले होते.

अपघाताच्या तीव्रतेमुळे चौघांचाही जागीच मृत्यू झाला. जमखंडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

धारवाडमध्ये सरकारी भरतीसाठी विद्यार्थ्यांचे भव्य आंदोलन; हजारोंचा सहभाग

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारच्या विविध विभागांतील रिक्त पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *