Monday , September 21 2026
Breaking News

कन्या विद्यालय बेळगुंदी शाळेचा दहावीच्या विद्यार्थिनींचा सदिच्छा समारंभ व पारितोषिक वितरण उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : विश्वभारत सेवा संचलित कन्या विद्यालय बेळगुंदी या शाळेचा दहावीच्या विद्यार्थिनीचा सदिच्छा समारंभ व पारितोषिक वितरण असा दुहेरी कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदीहळ्ळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत राणीसरकार सौ. धनश्री कर्णसिंह देसाई या उपस्थित होत्या. दीपप्रज्वलन बेळगुंदी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष किरण मोटणकर, युवा उद्योजक प्रसाद बोकडे, आप्पाजी शिंदे खजिनदार ग्रामस्थ मंडळ बेळगुंदी यांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती फोटो पूजन ग्रामपंचायत अध्यक्ष प्रताप सुतार, सावित्रीबाई फुले फोटो पूजन हेमा हदगल, स्वामी विवेकानंद फोटो पूजन एम. वाय. पाटील मुख्याध्यापक बेळगुंदी हायस्कूल बेळगुंदी, छत्रपती शिवाजी महाराज फोटो पूजन रवळनाथ बोकडे, संस्थामाता शांताबाई नंदीहळ्ळी प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत उपाध्यक्षा गीता ढेकोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. पारितोषिक पत्रांचे अनावरण गौतम भडांगे व विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शाळेची विद्यार्थिनी वैष्णवी पाटील हिची भारतीय सेनेत रुजू झाल्याबद्दल शाळेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी किरण मोटणकर, विनोद पाटील, प्रमुख वक्ते एम. बी. बाचीकर संचालक बीबीएसएस बेळगाव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी धनश्री सरदेसाई याने आजच्या मुली व त्यांची आव्हाने यशस्वी होण्यासाठी धैर्य आणि साहस बाळगण्याचे गरज याबद्दल संबोधन केले. संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदीहळ्ळी यानी अनेक आव्हाने पेलत विद्यार्थ्यांनी यश कसे संपादन करावे याबद्दल आपले विचार मांडले. यावेळी शाळेतील विद्यार्थिनी नीता चव्हाण, कविता सुतार, गायत्री कंग्राळकर, समीक्षा कुन्नूरकर, अफरोज शहापूरवाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत के. डी. पाटील, सूत्रसंचालन विद्या फाळके व आभार प्रदर्शन आर. व्ही. पाटील यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *