Sunday , December 7 2025
Breaking News

पाठ्यपुस्तक पुनरावलोकन समिती विसर्जित समितीचे काम संपल्याने निर्णय, नवीन समिती नाही

Spread the love

बंगळूर : कर्नाटक राज्य सरकारने राज्य पाठ्यपुस्तक पुनरावलोकन समिती विसर्जित करण्याची घोषणा केली आहे. पाठ्यपुस्तकांच्या सुधारणांवरून वाद सुरू असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले की, समितीचे नियुक्त कार्य पूर्ण झाल्यामुळे ती बरखास्त करण्यात आली आहे. कोणतीही आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास सरकार पुढील सुधारणा करण्यास तयार आहे यावर बोम्मई यांनी भर दिला.
१२ व्या शतकातील सुधारणावादी बसवण्णा यांच्यावरील एका अध्यायात सुधारणा करण्याच्या राज्य सरकारने केलेल्या हालचालीवर अनेक स्वामी आणि प्रमुख व्यक्तींनी आक्षेप घेतला होता.
विशेष म्हणजे, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित कन्नड आणि सामाज विज्ञान पाठ्यपुस्तकांमध्ये समाजसुधारक बसवण्णा यांच्या शिकवणींचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप द्रष्ट्यांच्या एका वर्गाने केला आहे. कवी कुवेम्पू यांच्या राज्यगीताचा अपमान केल्याचा आरोपही द्रष्ट्यांनी समीक्षा समितीवर केला.
विकृत राज्यगीत कोणत्याही पाठ्यपुस्तकाचा भाग नसल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने जारी केले. या आरोपांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश सरकारने सायबर गुन्हे विभागाला दिले.
बोम्मई यांनी असेही सांगितले की, बंगळुरचे संस्थापक केम्पेगौडा यांच्यावरील एक अध्याय पाठ्यपुस्तकात नव्याने जोडला गेला आहे. गेल्या महिन्यात राज्याच्या अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकांमध्ये चुकीच्या सुधारणांवरून वाद निर्माण झाला होता. आढावा समितीचे प्रमुख रोहित चक्रतीर्थ यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली. चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील समिती शालेय पाठ्यपुस्तकांची तपासणी आणि सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती.
नवीन समिती नाही
पाठ्यपुस्तक पुनरीक्षणासाठी नवीन समिती स्थापन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पाठ्यपुस्तक सुधारणा समितीचे काम पूर्ण झाल्याने समिती विसर्जित करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले.
चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर आणि होसदुर्ग तालुक्यांमध्ये विविध विकास कार्यक्रमांच्या उद्घाटन आणि अभिषेक प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. शालेय पाठ्यपुस्तकाबाबत अनेक स्वामीजींनी सरकारला पत्र लिहिले आहे. आम्ही त्यांच्याशी बोलू. आमचे बसवपंथाचे सरकार आहे, बसवण्णांची अनेक चांगली वचने आहेत.
२०१५ मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात स्थापन करण्यात आलेली बरगुरु रामचंद्रप्पा पाठ्यपुस्तक सुधारणी समिती आणि आताची समिती यांच्यात फक्त एका वाक्याचा फरक आहे. त्यात एकूणच बदल करून बसवण्णांचे खरे स्वरूप आणि त्यांचा खरा परिचय व्हावा अशीच सर्वांची ईच्छा आहे. यासाठी सर्वांचा सल्ला विचारात घेतला जाईल.
हेडगेवार पाठ रहाणारच
आरएसएसचे संस्थापक हेडगेवारांचा पाठ रहाणार आहेच. त्यात काहीतरी चुकीचे असल्यास आम्ही त्यात बदल करू. सरकार आपले काम लवकरच करेल, असा त्यांनी विश्वस व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *