Sunday , December 14 2025
Breaking News

राज्यातील 21 भ्रष्ट अधिकाऱ्यांवर एसीबीच्या धाडी

Spread the love

बेंगळुरू : बेंगळुरू भ्रष्टाचार प्रतिबंधक पथकाने (एसीबी) शुक्रवारी राज्याच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना चांगलाच धक्का दिला. 300 अधिकाऱ्यांच्या पथकाने सकाळी सहाच्या सुमारास राज्यभरातील विविध सरकारी विभागातील अधिकाऱ्यांच्या 80 ठिकाणी 21 भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या मालमत्ता आणि धनादेश ताब्यात घेण्यात आले आहेत. एसीबीने बेंगळुरूसह 10 जिल्ह्यात हे छापे मारले आहेत. बेळगाव, जेपी नगर, बसवणगुडी, चंद्र लेआऊट आणि दोद्दकल्लसंद्री येथे धाडी टाकण्यात आल्या आहेत.
धाडी टाकण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये भीमराव वाय. पवार (अभियंता अधीक्षक, बेळगाव), हरीश (सहाय्यक अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, उडुपी), रामकृष्ण एच. व्ही. (एईई, लघु पाटबंधारे, हसन, राजीव पुरसय्या नायक (सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कारवार), बी. आर. बोपय्या (कनिष्ठ अभियंता, पोन्नपेटे जिल्हा पंचायत), मधुसूदन (जिल्हा नोंदणी अधिकारी, आयजीआर कार्यालय, बेळगाव), परमेश्वरप्पा (सहाय्यक अभियंता, लघु पाटबंधारे), यल्लाप्पा एन. पडसाळी (आरटीओ, बागलकोट), शंकरप्पा नागप्पा गोगी (प्रकल्प संचालक, निर्मिती केंद्र, बागलकोट), प्रदीप एस एलुर (पंचायत ग्रेड-2 सचिव, आरडीपीआर, गदग), सिद्धप्पा टी. (उपमुख्य विद्युत अधिकारी, बंगलोर), थिप्पाण्णा पी. सिरसाघी (जिल्हा सचिव बिदर), मृत्युंजया चेन्नाबसय्या तिरानी (सहाय्यक नियंत्रक, कर्नाटक पशुवैद्यकीय, प्राणी आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, बिदर), मोहन कुमार (कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, चिक्कबल्लापूर जिल्हा), श्रीधर (जिल्हा निबंधक, कारवार), मंजुनाथ जी. (निवृत्त ईई सार्वजनिक बांधकाम विभाग), शिवलिंगय्या (क गट, बीडीए), उदय रवी (पोलीस निरीक्षक, कोप्पळ), बी. जी. थिम्मय्या (केस वर्कर, कदूर नगरपालिका), चंद्रप्पा सी. होळेकर (यूपीटी ऑफिस, रानबेन्नूर), जनार्दन (निवृत्त निबंधक मूल्यांकन (जमीन), बंगलोर) यामध्ये बेळगाव येथील भ्रष्ट अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

About Belgaum Varta

Check Also

युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार

Spread the love  महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *