हुबळी : केंद्र सरकारने अग्निपथ योजना रद्द करून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली.
हुबळी येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, केंद्राच्या अग्निपथ योजनेला काँग्रेसचा विरोध आहे. 4 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची काय परिस्थिती होईल याचा विचार केंद्राने केला आहे का? या योजनेच्या विरोधात हिंसक आंदोलन करू नये. शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आंदोलकांशी सरकारने चर्चा केली पाहिजे. अग्निपथ योजनेंतर्गत होणारी भरती थांबवली पाहिजे, अशी मागणी सिद्धरामय्या यांनी केली.
Check Also
अभियंता अतुलकडून निकीता मागत होती 80 हजार रुपये मेंटेनन्स
Spread the love बेंगळुरू : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यासह …