दक्षिण कन्नड प्रथम; बेळगावचा निकाल 59.88 टक्के
बेंगळुरू : कर्नाटक राज्य पदवीपूर्व शिक्षण मंडळाने घेतलेल्या 2021-22च्या पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकालात दक्षिण कन्नड जिल्हा शेकडा 88.02 सह राज्यात प्रथम आला असून त्याच्याच शेजारचा उडुपी जिल्हा द्वितीय आला आहे. विजापूर जिल्हा तिसर्या स्थानावर आहे.
गेल्या एप्रिल 23 ते मे 18 या काळात राज्यात पदवीपूर्व द्वितीय वर्षाची परीक्षा घेण्यात आली होती. त्यासाठी 6,84,255 विद्यार्थ्यानी नावनोंदणी केली होती. त्यात 3,46,936 मुलांचा तर 3,37,319 मुलींचा समावेश होता. राज्यात एकूण 1,076 केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. कला विभागात 2,28,167 विद्यार्थी, वाणिज्य विभागात 2,45,519 तर विज्ञान विभागात 2,10,569 विद्यार्थ्यानी ही परीक्षा दिली. तिचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यावेळी शेकडा 61.88 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा एकूण 5,99,794 विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. त्यापैकी 4,02,697 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांत विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी दिली.
निकालात यंदाही विद्यार्थिनींनी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागाचा निकालही चांगला लागला आहे. शहरी प्रदेशातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण शेकडा 61.78 असून ग्रामीण विद्यार्थ्यांचे प्रमाण त्याहून थोडे अधिक शेकडा 62.18 इतके आहे. निकालात दक्षिण कन्नड जिल्हा शेकडा 88.02 सह राज्यात प्रथम आला असून त्याच्याच शेजारचा उडुपी जिल्हा द्वितीय आला आहे. विजापूर जिल्हा तिसर्या स्थानावर आहे.
बेंगळूर दक्षिण चौथ्या तर चित्रदुर्ग जिल्ह्याने शेवटून पहिला क्रमांक मिळवला आहे. 3,37,006 मुलींपैकी 2,31,586 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 68.72% आहे. परीक्षा दिलेल्या 3,46,557 मुलांपैकी 1,91,380 मुले उत्तीर्ण झाली आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 55.22% आहे. कन्नड विषयात 563 विद्यार्थ्यानी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. दक्षिण कन्नड जिल्ह्याने शेकडा 88.02 सह राज्यात पहिले स्थान पटकावले आहे. तर चित्रदुर्ग जिल्हा शेकडा 49.31 सह राज्यात अंतिम स्थानावर राहिला आहे. 91106 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह म्हणजेच डिस्टिंक्शनसह पास झाले आहेत. गणित विषयात 14,200 विद्यार्थ्यानी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. इंग्लिशमध्ये 2 विद्यार्थ्यानी 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत.राज्यातील 56 कॉलेजचा निकाल 100% लागला आहे. त्यात 04 सरकारी आणि 02 पदवीपूर्व अनुदानित कॉलेजचा समावेश आहे. 50 अनुदानरहित खासगी कॉलेजचा निकाल 100% लागला आहे. कला शाखेत बळ्ळारीच्या श्वेता भीमाशंकर बैरगोंड आणि कोट्टुरूच्या इंदू कॉलेजची सहना या दोघीनी 600 पैकी 594 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. वाणिज्य विभागात जैन कॉलेजच्या मानव विजय केजरीवालने 596 गुणांसह राज्यात प्रथम स्थान मिळवले आहे. 6086 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले आहेत. कन्नड भाषा विषयात 563 विद्यार्थ्यानी 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. सायन्स विभागात 3 विद्यार्थ्यांनी 600 पैकी 598 गुण मिळवून राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे. सिमरन शेषराव, मोहम्मद रफिक आणि श्रीकृष्ण पेजताय अशी त्यांची नावे असल्याचे शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले.
Check Also
अभियंता अतुलकडून निकीता मागत होती 80 हजार रुपये मेंटेनन्स
Spread the love बेंगळुरू : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यासह …