Thursday , September 19 2024
Breaking News

संशयित दहशतवादी अख्तरला बंगळूरात अटक; त्याच्या संपर्कातील अन्य तिघांनाही ताब्यात

Spread the love

 

बंगळूर : सुशिक्षित शहर म्हणून ओळखले जाणारे राजधानी बंगळुर शहर आता दहशतवाद्यांचे अड्डे बनत असल्याची भीती व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूरमध्ये एका दहशतवाद्याला पकडल्यानंतर सीसीबी पोलिसांनी काल रात्री (रविवारी) टिळक नगरमध्ये लपून बसलेल्या एका संशयित दहशतवाद्याला पकडले आहे.
शहर पोलिस आयुक्त प्रताप रेड्डी यांनी सांगितले की, टिळकनगर येथे अनेक दिवसांपासून भाड्याच्या घरात राहणाऱ्या लष्कर-ए-तैयबाच्या संशयित दहशतवाद्याची माहिती मिळाली होती. सीसीबी पोलिसांनी रात्री कारवाई करून त्याला अटक केली. अख्तर हुसेन असे अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याचे नाव आहे. तो मूळ आसाममधील असून त्याच्या संपर्कात असलेल्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. रेड्डी यांनी सांगितले की, संशयित दहशतवादी अख्तर याने टिळक नगर येथील बीटीपी परिसरात तिसऱ्या मजल्यावर घर भाड्याने घेतले होते आणि तो तेथे राहत होता. केंद्र व राज्य सरकारच्या गुप्तचर खाते व स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. तो कट्टरवादी असल्याचे तपासादरम्यान निश्चित झाले आहे, असे ते म्हणाले.
तपासात असे आढळून आले की, संशयित दहशतवादी अख्तर आणि त्याच्यासोबत खोलीत रहात असलेले अन्य तीन तरुण अन्न वितरणाचे काम करत होते आणि हे चौघेही रात्रीच्या वेळीच फिरत होते. या चौघांपैकी कोणीही स्थानिकांच्या संपर्कात नव्हते. या संदर्भात निश्चित माहीती मिळविलेल्या सीसीबी पोलिसांनी ३० पेक्षा अधिक पोलिस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने काल सायंकाळी पाच वाजल्यापासूनच तो रहात असलेल्या ठिकाणी सापळा रचला. परंतु दोन तासांच्या प्रतिक्षेनंतर, अख्तर हुसेन सात वाजण्याच्या सुमारास घरी आला. काही वेळाने सीसीबीच्या पथकाने छापा टाकून त्याला अटक केली आणि त्याच्या संपर्कात असलेल्या अन्य तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
सीसीबी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दहशतवादी अख्तरची गुप्त ठिकाणी चौकशी करून माहिती गोळा करण्यास सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले. सायंकाळी त्याला न्यायालयासमोर हजर करून सखोल चौकशीसाठी पुन्हा ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरोपीविरुद्ध टिळक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीबी पोलिसांनी आरोपी कोणत्या दहशतवादी संघटनेशी हातमिळवणी करून काम करत होता आणि तो शहरात आणखी कोणाच्या संपर्कात होता, याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर असलेल्या तालिब हुसेनला गेल्या महिन्यातच अटक करण्यात आली होती. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक करून तपास सुरू केल्यानंतर तो श्रीनगरमधून आला आणि श्रीरामपूरमध्ये लपला होता,अशी माहिती उपलब्ध झाली होती. त्यानंतर शोध सुरू केलेल्या सीसीबी पोलिसांनी अख्तरला काल ताब्यात घेतले.
लष्कर-ए-तैयबा लिंक
टिळक नगरमधील कारवाईत काल रात्री अटक करण्यात आलेला आसामस्थित संशयित अतिरेकी अख्तर हुसैन याचे सीसीबी पोलिसांच्या तपासात लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सीसीबी पोलिसांनी फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा आणि टिळक नगर येथे राहणारा संशयित अतिरेकी अख्तर नगरमध्ये दहशतवादी कारवाया करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

भाजप काळातील घोटाळ्यांच्या चौकशीला गती देणार

Spread the love  जी. परमेश्वर; आठवडाभरात मंत्री समितीची बैठक बंगळूर : मागील भाजप सरकारच्या काळात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *