सीईटी परीक्षेचा निकाल, सर्व अभ्यासक्रमात बंगळूरचे विद्यार्थी अव्वल
बंगळूर : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) निकाल शनिवारी (ता. ३०) जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत बंगळूरच्याच विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.
यावेळी सीईटी परीक्षेत मुलांनी अव्वल ठरत मुलीना मागे टाकले. २.१६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते आणि २.१ लाख उमेदवार परीक्षेला बसले होते. १.७४ लाख उमेदवार बी फार्मा आणि डी फार्मासाठी, १.७१ लाख उमेदवार अभियांत्रिकीसाठी, १.४२ लाख उमेदवार बीएनवायएस (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी आणि योगिक विज्ञान) आणि बीव्हीएससी (बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स) आणि बीएससी (अॅग्री) साठी १.३९ लाख उमेदवार पात्र आहेत.
कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने टॉपर्सची यादी जाहीर केली आहे ज्यात सर्व प्रथम क्रमांक बेंगळुरूवासीयांनी पटकावला आहे.
रँक विजेते:
नॅशनल पब्लिक स्कूल, यलहंका येथील अपूर्व टंडन याने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या क्रमवारीत ९८.६११ टक्केवारीसह अव्वल स्थान पटकावले. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सचा हृषिकेश नागभूषण यांने अनुक्रमे ९९.१६७ आणि ९८.३३३ टक्केवारी गुणांसह बीएनवायएस आणि बीव्हीएससी अभ्यासक्रम क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. एचएएल पब्लिक स्कूलचा अर्जुन रविशंकर बीएससी (अॅग्री) रँकमध्ये एकूण ९६.२९२ गुणांसह अव्वल ठरला. विद्यारण्यपुरा येथील नारायण ई-टेक्नो स्कूलचा शिशिर आर. के. हा एकूण ९८.८८९ गुणांसह बी. फार्मामध्ये अव्वल ठरला आहे.
अभियांत्रिकी
अपूर्व टंडन (९८.६११ टक्के – प्रथम), सिद्धार्थ सिंग (९८.३३४ टक्के – द्वितीय), आत्मकुरी व्यंकट मधी (98.१११ टक्के – तृतीय)
निसर्गोपचार आणि योग
नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्सच्या हृषिकेश (९८ टक्के- प्रथम), उडुपी येथील मडावा कृपा इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी व्रजेश (९६ टक्के – द्वितीय), चैतन्य टेक्नो स्कूलचा कृष्णा (९६ टक्के – तृतीय)
बीएससी (अॅग्री)
एचएएल पब्लिक स्कूलचा अर्जुन (९३ टक्के- प्रथम), चैतन्य टेक्नो स्कूल, उल्ला सुमित (९२ टक्के – द्वितीय), तुमकूर विद्यानिकेतन पीयू कॉलेज सुदीप (९२ टक्के – तृतीय)
बीव्हीएससी (पशुवैद्यकीय)
नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स, बंगळूर (९८ – प्रथम), श्री चैतन्य टेक्नो स्कूल, के.आर. पुरमचा मनीष (९७ – टक्के – द्वितीय), शुभा कौशिक (९६ टक्के – तृतीय) प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
विद्यार्थ्याना परीक्षेचा निकाल kea.kar.nic.in या संकेतस्थळावर पहाता येईल.
Belgaum Varta Belgaum Varta