Saturday , October 19 2024
Breaking News

राज्यातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी अलमट्टी जलाशयाची उंची वाढविण्याचे लक्ष्य : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई  

Spread the love

 

अंकली (प्रतिनिधी) : कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रासह संपूर्ण कोकण प्रदेश व कृष्णा नदीला मिळणाऱ्या उपनद्यांच्या क्षेत्रात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून कर्नाटक राज्यातील सर्व धरणे पूर्ण भरली आहेत. अलमट्टी जलाशयाची उंची 519 फुटांवरून 524 फुटांपर्यंत वाढवण्याचे आमचे लक्ष्य असून त्या दृष्टीने आम्ही आधीच बरीच पावले उचलली आहेत, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले.

विजापूर जिल्ह्यातील निडगुंदि तालुक्यातील अलमट्टी येथील लालबहादूर शास्त्री जलाशयात आज उत्तर कर्नाटकाची जीवदायिनी कृष्णा नदीला ओटी अर्पण करून गंगापूजन केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी मुख्यमंत्री बोम्मई बोलत होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, यंदा चांगला पाऊस झाल्याने राज्यातील 80% तलाव बंधारे भरले आहेत, भूगर्भातील पाणीही वाढले आहे, यावेळी अलमट्टीही महिनाभरापासून तुडुंब भरली आहे. अतिशय उंच असलेल्या 519 फूट उंचीपर्यंत पाणी साचले आहे हे पाहून आनंद होतो. या पार्श्वभूमीवर आम्ही कृष्णा नदीला गंगापूजन करून ओटी अर्पण केली आहे. यूकेपी योजनेअंतर्गत हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन कायद्यानुसार, पुनर्-गृहनिर्माण, पुनर्बांधणी (R&R) सेटल केल्यानंतर, अलमट्टी धरणाची उंची 524 फूटांपर्यंत वाढवावी लागेल, अपर कृष्णा प्रकल्पाचा तिसरा टप्पा सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून अलमट्टी जलाशयात गंगा पूजन

विजापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज निडगुंदी तालुक्यातील अलमट्टी येथील लालबहादूर शास्त्री जलाशयाचे गंगा पूजन केले. हुबळीहून हेलिकॉप्टरने आल्यानंतर त्यांनी अलमट्टी येथील लाल बहादूर शास्त्री जलाशय येथे जाऊन कृष्णा नदीचे गंगापूजन केले. यावेळी पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ, मुद्देबिहाळचे आमदार एस. एस. पाटील नडहळ्ळी, विजापूरचे खासदार रमेश जिगजिनगी, माजी मंत्री अप्पू पट्टणशेट्टी, कर्नाटक बियाणे निगम संस्थेचे अध्यक्ष विजुगौडा पाटील, माजी मंत्री संगन्ना के. बेलुब्बी, भाजपचे विधानपरिषद सदस्य पी. एच. पुजार, भाजप विजापूर जिल्हाध्यक्ष आर. एस. पाटील-कुचाबाळ, भाजप नेते राजेंद्र वाली, अप्पुगौडा पाटील मनगुळी आदी यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *