हसन : अरसिकेरे तालुक्यातील गांधीनगरजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. धर्मस्थळावरून परतणाऱ्या टीटी वाहनाला बस आणि लॉरीची धडक झाली. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 69 वर घडली.
यात 5 मुलांसह 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 5-6 जण जखमी झाले आहेत. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, अपघात इतका भीषण होता की मृतदेहांचे तुकडे झाले आणि वाहनांचा चक्काचूर झाला.
बानावर पोलीस अपघातस्थळी दाखल झाले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta