Tuesday , March 3 2026
Breaking News

अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 14 किंवा 15 डिसेंबरला सीमाप्रश्नी बैठक

Spread the love

 

बेंगळुरू : कर्नाटक-महाराष्ट्र या दोन राज्यातील बेळगाव सीमाप्रश्नावरून राजकारण तापले आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी आवाज उठवल्यानंतर आता केंद्र सरकारनेही याची दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 14 किंवा 15 डिसेंबरला उभय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

बेंगळूर येथे विधानसौधमध्ये आज शनिवारी माजी मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केल्यावर बोम्मई प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, कर्नाटकाच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ येत्या सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. 14 किंवा 15 डिसेंबरला उभय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मला बोलावले आहे. मी अमित शहा यांच्याशीही बोललो आहे. बैठकीस बोलावल्यावर येईन असे सांगितले आहे. कर्नाटकचा मुद्दा, भूमिका आणि वस्तुस्थिती आधीच सांगितली आहे. तसेच अनेक तपशील दिले आहेत. या बैठकीत कर्नाटकची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे बोम्मई म्हणाले.

सीमाप्रश्नी सरकार घेणार असलेल्या सर्वपक्षीय बैठकीबाबत बोलताना, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी मी चर्चा केली. बैठकीचे वेळापत्रक निश्चित होताच त्याची माहिती त्यांना दिली जाईल, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *