Monday , September 21 2026
Breaking News

बेळगुंदीत 17 वे मराठी साहित्य संमेलन उद्या

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी बेळगुंदी (ता. जि. बेळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दि. 11 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 17 वे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

बेळगुंदी येथील मरगाई देवस्थान परिसरातील ज्येष्ठ साहित्यिक कै. नागनाथ कोत्तापल्ले साहित्यनगरी येथे हे संमेलन होणार आहे. साताऱ्याचे प्रा. डॉ. यशवंत संभाजीराव पाटणे हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत. बेळगुंदी येथील हे 17 वे मराठी साहित्य संमेलन एकूण चार सत्रांमध्ये होणार आहे.

सकाळच्या पहिल्या सत्रात ग्रंथदिंडी, संमेलनाचे उद्घाटन आदी कार्यक्रम मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत होणार आहेत. संमेलनाचे उद्घाटक माजी जि. पं. सदस्य मोहनराव मोरे हे असणार असून स्वागताध्यक्ष रामचंद्र गणपती पाटील हे असतील.

संमेलनाच्या दुपारी 1:30 वाजता होणाऱ्या दुसऱ्या सत्रात ‘साहित्य आणि वर्तमान काळ’ या विषयावर परिसंवादाचा कार्यक्रम होईल. प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादामध्ये प्रा. दि. बा. पाटील (सांगली) डॉ. दीपक स्वामी (इस्लामपूर) आणि प्रा. भिमराव धुळूबुळू (मिरज) यांचा सहभाग असणार आहे. तिसऱ्या सत्रात डॉ. अनिता खेबुडकर (मिरज) यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल.

या संमेलनात निवडक कवींकडून निवडक कवितांचे वाचन होईल. चौथ्या शेवटच्या सत्रात ‘कुटुंब रंगलाय काव्यात’ हा कार्यक्रम होईल. विसुभाऊ बापट (मुंबई) हे या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *