Tuesday , March 3 2026
Breaking News

लिंगायत, वक्कलिगांना आरक्षणाचा मंत्रिमंडळाचा निर्णय

Spread the love

 

वक्कलिगांना २ सी, लिंगायतांना २ डी स्वतंत्र प्रवर्ग

बंगळूर : पंचमसाली समाजाची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. सामर्थ्यशाली समुदायांच्या सततच्या संघर्षाचे परिणाम शेवटी मिळाले. आता राज्य सरकारने पंचमसाली, वक्कलिग आणि लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचे मान्य केले आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक होऊन महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला.
पंचमसाली आणि वक्कलीग समाजासह वीरशैव लिंगायत समाजाला स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने लिंगायत आणि वक्कलिगांसाठी नवीन श्रेणी तयार केली आहे, ३ ए मध्ये असलेल्या वक्कलिगांना २ सी मध्ये आणि ३ बी मध्ये असलेल्या लिंगायतांना २ डी श्रेणीमध्ये आरक्षण देण्यात आले आहे. मात्र आरक्षणाचे प्रमाण नंतर ठरवले जाईल, असे कायदा आणि संसदीय मंत्री जे. सी. मधुस्वामी यांनी सांगितले.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे मधुस्वामी यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मधुस्वामी म्हणाले की, पंचमसालीसह वीरशैव लिंगायतांना ज्यांनी २ ए आरक्षण मागितले होते, त्यांना २ डी वर्गात आरक्षण देण्यात आले आहे. ३ ए मध्ये असलेल्या ल अविवाहितांवक्कलीगाना २ सी आरक्षण दिले आहे. ते म्हणाले की, २ ए आणि २ बी आरक्षणात कोणताही बदल होणार नाही.
या संदर्भात, गेल्या आठवड्यात राज्य सरकारला अंतरिम अहवाल सादर करणारे स्थायी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष जयप्रकाश हेगडे यांनी पंचमशाली समाजाचा सध्याच्या ३ बी मधून २ बी मध्ये समावेश करण्याऐवजी स्वतंत्र आरक्षण प्रवर्ग तयार करून द्यावा, अशी शिफारस केली आहे.
आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठीचे १० टक्के आरक्षण कमी करून ६ टक्के करण्यात आले आहे. मधुस्वामी म्हणाले, की २ डी आणि २ सी मध्ये ४ टक्के आरक्षण दिले जाईल. ब्राह्मणांसह सर्व उच्चवर्णीय आर्थिक हिंदूंचे आरक्षण कापले गेले आहे.
पंचमसाळी समाजाने ‘२ ए’ आरक्षणासाठी लढा दिला होता. कुडल संगमच्या बसव पीठाचे स्वामीजी जयमृत्युंजय यांच्या नेतृत्वाखाली मोठा संघर्ष झाला आहे. पण २ ए आरक्षणासाठी लढणाऱ्या पंचमसाळी समाजाला २ सी अंतर्गत आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

——————————————————–

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची अधिकृत माहिती नाही. जयमृत्युंजय स्वामीजी म्हणाले की, मंत्री बसनागौडा पाटील यत्नाळ आणि ईरण्णा काडाडी यांच्याशी चर्चा करून अभिप्राय देऊ. २ ए आरक्षण हाच आमचा संघर्ष आहे. मात्र आता २ ए आरक्षणाऐवजी इतर प्रवर्गांतर्गत आरक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती माध्यमांकडून मिळाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची संपूर्ण माहिती घेऊन माझा अभिप्राय देऊ.

– जयमृत्युंजय स्वामीजी

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *