बंगळूर : केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) बनावट मार्क्स कार्ड रॅकेट चालवणाऱ्या पाच संस्थांवर छापे टाकले आणि भारतातील नामांकित विद्यापीठांच्या सहा हजार बनावट गुणपत्रिका जप्त केल्या.
गेल्या काही दिवसांत सीसीबीकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. मार्क्स कार्ड रॅकेटच्या पोलिस तपासात बंगळुरच्या विविध भागांतील पाच संस्था या रॅकेटमध्ये सामील असल्याचे समजते.
पोलिसांनी राजाजीनगर येथील न्यू क्वेस्ट टेक्नॉलॉजी, जे.पी. नगर येथील सिस्टीम क्वेस्ट, चंद्रप्पा लेआउट येथील आरोही इन्स्टिट्यूट, दासरहळ्ळी येथील विश्व ज्योती महाविद्यालय आणि विजयनगर येथील बेनाका करस्पॉन्डन्स कॉलेजवर छापे टाकले. त्यांच्याकडून विविध विद्यापीठांची सहा हजार ८०० बनावट गुणपत्रिका, २२ लॅपटॉप, संगणक आणि १३ मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
शुक्रवारी (ता. २७) सीसीबी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की एका आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आम्ही विकास भगत या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी अनेक वर्षांपासून या रॅकेटमध्ये सामील होता. आमच्या प्राथमिक तपासणीनुसार, पाच संस्था नामांकित विद्यापीठांची पदवी गुणपत्रिका २५ हजार ते ३५ हजार पर्यंत पैसे घेऊन देण्यात येत होत्या, असे अधिकाऱ्याने सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta