रायचूर : अल्पवयीन मुलाला बेकायदेशीरपणे दत्तक घेतल्याप्रकरणी प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार सोनू गौडा हिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणासंदर्भात पोलीस आणि अधिकाऱ्यांनी त्या मुलाला मूळ गावी रायचूरला घेऊन गेले आहेत.
सोनू गौडा हिने नुकताच रायचूरमधील एका मुलाला दत्तक घेतल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. पण सोनू गौडावर बेकायदेशीरपणे मूल दत्तक घेतल्याचा आरोप होता. याबाबत जिल्हा व बाल हक्क संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. बंगळुरू येथील बदरहळ्ळी पोलिसांनी तक्रारीवरून सौनु गौडा हिला अटक केली. आज त्या बालकाला रायचूर जिल्ह्यातील मस्की तालुक्याच्या गावी आणले होते.