
गदग : गदग शहरातील दासर ओणी नगरपरिषद उपाध्यक्षा यांच्या मुलासह एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली. बेळगावचे पोलिस महानिरीक्षक विकास कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

घरात झोपलेल्यांची हल्लेखोरांनी भोसकून हत्या केली. एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या झाल्याने गदग जिल्हा हादरला आहे.
नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा सुनंदा बाकळे यांचा मुलगा कार्तिक बाकळे (27) परशुराम (55), पत्नी लक्ष्मी (45) आणि मुलगी आकांक्षा (16) या चार जणांची हत्या करून हल्लेखोर फरार झाले.
घराच्या पहिल्या मजल्यावर झोपलेल्या पती, पत्नी आणि मुलीची हत्या करण्यात आली. 17 एप्रिल रोजी कार्तिक बाकळे यांचे नातेवाईक लग्नाची तारीख निश्चित करण्यासाठी आले होते. नातेवाईक आणि कार्तिक या चौघांची हत्या करून हल्लेखोर फरार झाले.
पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta