Sunday , September 20 2026
Breaking News

काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची महाविद्यालयात हत्या; एकतर्फी प्रेमातून माथेफिरूचे कृत्य

Spread the love

 

हुबळी : हुबळीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हुबळी-धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या मुलीचा महाविद्यालयात दिवसाढवळ्या निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला. आरोपी आणि पीडिता एकाच महाविद्यालयात शिकत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फयाज (वय २३) नामक आरोपीने २१ वर्षीय नेहा हिरेमठचा खून केला. आरोपी बेळगाव जिल्ह्यातला असून त्याचे कृत्य महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. नेहाचा पाठलाग करून फयाजने तिची हत्या केली आणि त्यांतर घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला तात्काळ पकडण्यात आले. पोलिस सध्या या घटनेमागचा हेतू तपासत आहेत.

नेहा हिरेमठ हुबळीच्या केएलई टेक्नोलॉजिकल विद्यापीठात एमसीएच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. हत्या झाल्यानंतर नेहाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केम्पेगौडा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी आरोपीबाबत माहिती देताना सांगितले की, फयाज सरकारी शिक्षक असलेल्या पालकांचा मुलगा आहे. पहिल्या वर्षाच्या परिक्षेत नापास झाल्यामुळे मागच्या सहा महिन्यांपासून तो महाविद्यालयात येत नव्हता. गुरुवारी (दि. १८ एप्रिल) तो स्वतःबरोबर धारधार शस्त्र घेऊन महाविद्यालयात आला आणि त्याने नेहा हिरेमठ हिच्यावर अनेक वार केले. हत्या केल्यानंतर पळून जात असताना स्थानिकांच्या मदतीने फयाजला पकडण्यात आले.

नेहा हिरेमठवर वार करून पळाल्यानंतर महाविद्यालयातील इतर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी नेहाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून फयाज नेहाचा पिच्छा पुरवत होता.

दरम्यान या घटनेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. नेहाचा खून करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *