दरवाढीमुळे भाविकांच्या खिशाला खात्री : फुलांची आवक मंदावली निपाणी(वार्ता) : गणेशोत्सवा पाठोपाठ गुरुवारी (ता.२१) जेष्ठा गौरींचे (महालक्ष्मी) आगमन झाले आहे. त्यामुळे निपाणी बाजारात फुलांची मागणी वाढली असून आवक कमी असल्याने भाव वाढले आहेत. परिणामी गौरीच्या फुलांच्या हारांच्या जोडीचे दरही वधारले असून १२०० रुपयापर्यंत गेले आहेत. गेल्या चार ते पाच …
Read More »कुर्लीतील झिम्मा फुगडी स्पर्धेत सोनाळीचा संघ प्रथम
निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील एचजेसी चिफ फौंडेशनच्या वतीने गणेशोत्सव निमित्त झिम्मा-फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन उदघाटन कागल तालुका शिवसेना महिला आघाडी प्रमुख रुपाली पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कमल चौगुले या होत्या. स्पर्धेमध्ये सोनाळी येथील नागनाथ महिला मंचने प्रथम क्रमांक पटकावला. एस. एस. चौगुले यांनी, …
Read More »शहापूर श्री काळभैरव मंदिराचा जीर्णोद्धार आणि कळसारोहण सोहळ्याला प्रारंभ
बेळगाव : बेळगाव परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथे असलेल्या प्राचीन आणि बेळगाव परिसरातील एकमेव श्री काळभैरव मंदिराचा उल्लेख करावा लागतो. संस्थानिक काळापासून अस्तित्वात असलेल्या या प्राचीन श्री काळभैरव मंदिराचा जीर्णोद्धार आणि कळसा रोहन सोहळा आज गुरुवारी सकाळी मोठ्या भक्तीभावात प्रारंभ झाला …
Read More »गौराई आली सोनपावलांनी
निपाणी परिसरात स्वागत : वरुणराजाकडे पावसाची मागणी निपाणी (वार्ता) : विघ्नहर्त्या गणरायाच्या प्रतिष्ठापणेनंतर गौरीची स्थापना केली जाते. त्यामुळे दोन दिवसांपासून स्वागताची तयारी केली होती. गुरुवारी (ता. २१) दिवसभर गौरीच्या आवाहनासाठी नदी, तलाव, जलकुंभ आणि विहिरीवर महिलांची लगबग दिसून आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह अनेक घरांत मुखवट्याच्या गौरी पुजल्या. या मुखवट्यावर …
Read More »मनुस्मृतीमध्ये समाज नियमांच्या नोंदी : प्रा. आनंद मेणसे
बेळगाव अंनिसतर्फे जागर विवेकाचा उपक्रमांतर्गत विशेष व्याख्यान बेळगाव : आधी समाज तयार होऊन त्याच्या व्यवस्थेच्या आणि नियमांच्या नोंदी मनूने दोन हजार वर्षांपूर्वी मनुस्मृती ग्रंथात नोंदवल्या आहेत. म्हणून हा कायद्याचा ग्रंथ असून यात एकूण बारा अध्याय आणि तब्बल दोन हजार सहाशे चौऱ्यांशी श्लोक आहेत. ब्रम्हदेवाने भृगुला हे नियम सांगितले. भृगुने …
Read More »केडीसीसी बँकेच्या दुधाळ म्हैस योजनेचा लाभ घेऊन दूध संकलन वाढवा
– गोकुळचे संचालक युवराज पाटील यांचे आवाहन – कागलमध्ये दूध उत्पादकांना दुधाळ म्हैस कर्ज योजनेच्या मंजुरीपत्रांचे वाटप कागल (प्रतिनिधी) : केडीसीसी बँकेने सुरू केलेल्या दुधाळ म्हैस कर्ज योजनेचा लाभ घेऊन दूध संकलनात वाढ करा, असे आवाहन गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील यांनी केले. कागलमध्ये दूध उत्पादकांना दुधाळ म्हैस …
Read More »सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक
सदाशिव पोवार; निपाणीत शेतकऱ्यांची बैठक निपाणी (वार्ता) : अनामत तत्वावर सोयाबीन घेऊन भिवशी येथील संजय भिमगोंडा पाटील या सोयाबीन व्यापाऱ्याने कोट्यावधी रुपयांचे सोयाबीन शेतकऱ्यांच्याकडून खरेदी केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या अनामत म्हणून दिलेल्या सोयाबीनची किंमत मागण्यास सुरुवात केल्यापासून संजय पाटील यांनी घराला टाळे ठोकून कुटुंबीयांसह पलायन केले आहे. त्यामुळे शेतकरी …
Read More »ऐतिहासिक! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक 454 मतांनी मंजूर, विरोधात फक्त दोनच मते
नवी दिल्ली : लोकसभेत महिला आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर हे विधेयक मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने 454 तर विरोधात फक्त दोन सदस्यांनी मतदान केले. महिला आरक्षण विधेयक हे घटनादुरुस्ती विधेयक आहे. महिला आरक्षण विधेयक आता राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. राज्यसभेच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी संघटनेची नव्याने स्थापना…
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी या संघटनेच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासनतर्फे निपाणी सीमाभागात रोजगार मेळावा साजरा केला होता. संघटना कुठे नावारूपास होत असताना संघटनेत दुफळी निर्माण झाली असून निपाणीमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभाग अशी दुसरी संघटना उभी करण्यात आली आहे.. गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण युवा …
Read More »कोल्हापुरात गौतमी पाटीलला “नो एन्ट्री”
मनोरंजन विभागासह पोलिसांनी परवानगी नाकारली कोल्हापूर : जिथं नाच तिथं वाद आणि राडा असं समीकरण झालेल्या नर्तकी गौतमी पाटीलच्या कोल्हापुरातील प्रस्तावित दोन्ही कार्यक्रमांना कोल्हापूर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सव सुरक्षेचा ताण पाहता पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जेव्हा जेव्हा गौतमीचे राज्यात इतरत्र कार्यक्रम पार पडले आहेत त्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा पोलिसांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta