Thursday , December 18 2025
Breaking News

Belgaum Varta

नलिन कुमार कटील यांच्याकडून भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

  बंगळूर : दक्षिण कन्नडचे खासदार नलिन कुमार कटील यांनी भाजपच्या कर्नाटक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. शनिवारी बल्लारी येथे पत्रकारांना संबोधित करताना, कटील म्हणाले की, मे महिन्यात झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी पक्षाच्या हायकमांडकडे राजीनामा दिला आहे. “भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा माझा दोन वर्षांचा कार्यकाळ …

Read More »

दानशूरांमुळे कॅन्सरग्रस्त बालकावर यशस्वी उपचार

  बेळगाव : जनतेने केलेल्या आर्थिक मदतीमुळे एका गरीब दुर्बल घटकातील 6 वर्षाच्या बालकाच्या कॅन्सर उपचारासाठी मदत झाली असून तो मुलगा हळूहळू बरा होत आहे. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, गोकाक येथील 6 वर्षीय भर्माप्पा गौडा या बालकाला कॅन्सरने (ॲक्युट लिंफोब्लास्टिक लुकेमिया) ग्रासले होते. मात्र घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने …

Read More »

बेळगाव शहरासह विविध उपनगरांतील आणि काही गावांचा उद्या वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : वीजवाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीच्या कारणास्तव रविवारी (ता. 25 जून) विविध उपनगरांसह काही गावांचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. भारतनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, अळवण गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली, यरमाळरोड, बाजार गल्ली, तेग्गीन गल्ली, चावडी गल्ली, येळ्ळूर रोड, दत्त गल्ली, राजवाडा कंपाउंड, सर्वोदय कॉलनी, नाझर …

Read More »

मुलांच्या भवितव्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची

  आशिषभाई शाह; देवचंद महाविद्यालयात सत्कार समारंभ निपाणी (वार्ता) : शालेय जीवनात कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट मार्गदर्शन असेल तरच पुढील खडतर प्रवास सुखकर होईल. यामध्ये पालकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. या पंचक्रोशीतील शाळांचे देवचंद महाविद्यालयांशी असलेले ऋणानुबंध आजही अखंडीत आहेत. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून महाविद्यालय व आपण नेहमीच कटिबद्ध …

Read More »

महिलांना बस प्रवास करत आहात मग सावधान; पोलिसांचे आवाहन

  बेळगाव : राज्य सरकारने महिलांसाठी शक्ती योजनेअंतर्गत मोफत बस प्रवास सुरू केला आहे. सर्वच बसमध्ये महिलांची झुंबड उडत आहे.गर्दीचा फायदा घेत महिलांच्या सोन्या चांदीचे दागिने, पैसे पळवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे बेळगाव शहर पोलिसांनी बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांना चोरांपासून सावधानता बाळगावी असे आवाहन प्रत्येक बस मध्ये जाऊन करत …

Read More »

सरसकट दोनशे युनिट मोफत वीज नाही; हेस्कॉमचे स्पष्टीकरण

  बेळगाव : राज्य शासनाच्या गृहज्योति योजनेतून 200 युनिट पर्यंत वीज मोफत दिले जाणार असली तरी प्रत्येक कुटुंबाची गेल्या वर्षभरातील वीज वापराची सरासरी काढली जाणार आहे. त्या सरासरीपेक्षा दहा टक्के अतिरिक्त युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. त्यामुळे सर्वच कुटुंबं सरसकट 200 युनिट वीज मोफत मिळणार नसल्याचे नक्की झाले आहे. …

Read More »

मनपा आयुक्तपदी अशोक धुडगुंटी यांची नियुक्ती

  बेळगाव : बेळगाव महापालिका आयुक्त पदी केएएस अधिकारी अशोक धुडगुंटी यांची नियुक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारने बजावला असून मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांची बदली अन्यत्र करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या अधीन कार्यदर्शिनी शुक्रवारी हा नियुक्तीचा आदेश बजावला आहे. अशोक धुडगुंटी यांनी या अगोदर निवासी जिल्हाधिकारी म्हणून बेळगावात सेवा बजावली …

Read More »

तळपत्या सूर्याभोवती इंद्रधनूचे वलय

  गुरुवार ठरला खगोलीय घटनेचा साक्षीदार ; अनेकांना घटनेचे कुतुहल निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरातील नागरिक गुरुवारी (ता. २२) एका सुंदर खगोलीय घटनेचे साक्षीदार ठरले. तळपत्या सूर्याला इंद्रधनुष्याने वेढल्याचा सुखद अनुभव विज्ञान प्रेमी नागरिकासह सर्वांनी घेतला. गुरुवारी (ता. २२) दुपारच्या वेळी सूर्याभोवती इंद्रधनुष्याचे गोल रिंगणतयार तयार झाले होते. …

Read More »

टीम इंडियाच्या चीफ सिलेक्टर पदासाठी बीसीसीआयने मागवले अर्ज

  नवी दिल्ली : बीसीसीआयमध्ये आता काही जागा रीक्त असल्याची माहिती समोर आली आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटरवरर ही माहिती दिली आहे. बीसीसीआयमध्ये कोणत्या पदांसाठी भर्ती करण्यात येणार आहे आणि त्यासाठी अटीन व नियम काय असतील, याची माहिती आता समोर आली आहे. निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर फेब्रुवारी …

Read More »

भूतरामट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात येणार नवा पाहुणा

  बेळगाव : भूतरामट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील वाघांची संख्या लवकरच चारवर पोहोचणार आहे. सध्या संग्रहालयात 3 वाघ असून आणखी एक वाघीण राष्ट्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून येथील संग्रहालयासाठी मंजूर झाली आहेत. या तिन्ही वाघांच्या सोबतीला पुढील आठवडाभरात बन्नेरघट्टा प्राणी संग्रहालयातून वाघीण भूतरामट्टीत दाखल होणार आहे. संग्रहालयाला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस …

Read More »