बेळगाव : सरकारी हॉस्टेल आणि वसती शाळेत काम करणाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन नोकरीत कायम करावे या मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य सरकारी हॉस्टेल आणि वसती शाळा कंत्राटी नोकर संघाच्या बेळगाव शाखेतर्फे जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. सरकारी हॉस्टेल्स आणि वसती शाळांमध्ये स्वयंपाकी, …
Read More »पोलीस अधिकाऱ्यांची हलगा ग्राम पंचायतला भेट; जनसंपर्क सभा संपन्न
बेळगाव : हलगा ग्रामपंचायतीला नूतन डीएसपी श्रीमती पद्मश्री, बागेवाडीचे सीपीआय तुकाराम नीलगार, पीएसआय अविनाश आणि पीएसआय परवीन बिरादार यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यानिमित्त जनसंपर्क सभा देखील पार पडली. हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष सागर कामानाचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास ग्रा. पं. उपाध्यक्ष सुजाता बडगेर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य …
Read More »पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या आणि आयजीपी सतीश कुमार यांची बदली
बेळगाव : कर्नाटक राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची जोरदार चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी राज्यातील पंधरा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची बदली करण्यात आली असून ते आता म्हैसूर झोन डीजीपी …
Read More »गायिका शुभा कुलकर्णी यांचे निधन
बेळगाव : बेळगावच्या सुप्रसिद्ध गायिका आणि सेंट झेवियर्स हायस्कूलच्या माजी शिक्षिका शुभा कुलकर्णी यांचे आज मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास आजारपणामुळे वेणूग्राम हॉस्पिटल येथे निधन झाले. उत्तम गायिका म्हणून सुपरिचित असलेल्या शुभ कुलकर्णी सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये हिंदीच्या शिक्षिका होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालक म्हणून भूमिका बजावली होती. शहरातील …
Read More »केंद्र सरकारविरोधात राज्य कॉंग्रेसची निदर्शने
बेळगाव : राज्य सरकारची अन्नभाग्य योजना साकार होऊ नये यासाठी धडपडणाऱ्या केंद्र सरकारचा कर्नाटक काँग्रेस पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला. सर्वसामान्य गरीब जनतेला 10 किलो मोफत तांदूळ देण्याच्या कर्नाटक राज्य सरकारच्या महत्त्वाकांशी “अन्यभाग्य” योजनेसाठी तांदूळ उपलब्ध करण्यास केंद्र सरकारच्या निर्देशानुसार भारतीय अन्न महामंडळाने ऐनवेळी नकार दिली. याच्या निषेधार्थ कर्नाटक …
Read More »सुवर्ण सौध येथे उद्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन
बेळगाव : भारत सरकार आणि कर्नाटक सरकार यांच्या मार्गदर्शक सूचीनुसार आयुष्य खाते, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि अन्य विविध खात्यांतर्फे उद्या बुधवार दि. 21 जून रोजी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत 9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आयुष्य खात्याचे अधिकारी डॉ. श्रीकांत सुळधोळी …
Read More »आदिपुरुषवर तत्काळ बंदी घाला; ऑल इंडिया सिने वर्कर्सचे पीएम मोदींना पत्र
नवी दिल्ली : ऑल इंडिया असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आदिपुरुष चित्रपटाचे स्क्रिनिंग थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच तत्काळ थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. “आम्हाला दिग्दर्शक ओम राऊत, संवाद लेखक मनोज मंतशिर शुक्ला आणि चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध एफआयआरची गरज …
Read More »बालासोर रेल्वे अपघात; सीबीआयकडून सिग्नल जेई आमिर खानचे घर सील
नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर रेल्वे अपघाताची चौकशी सीबीआयने सुरू केली आहे. दरम्यान, सीबीआयने मोठी कारवाई करत सोरो सेक्शन सिग्नलचे ज्युनियर इंजीनियर आमिर खान यांचे घर सील केले आहे. अपघाताचा तपास हाती घेतल्यानंतर सीबीआयने त्यांची चौकशी केली होती. मात्र, या चौकशीनंतर आमिर खान कुटुंबासह घर सोडून बेपत्ता झाला होता. …
Read More »बनावट कागदपत्राद्वारे बेनकनहळ्ळीतील भूखंड विक्री
चौघांविरोधात गुन्हा दाखल बेळगाव : बनावट कागदपत्र तयार करून बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत अखत्यारितील सरस्वतीनगरमधील भूखंड विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी बनावट दस्ताऐवज तयार करून फसवणूक ल्याप्रकरणी उत्तर उपनोंदणी अधिकारी रवींद्रनाथ उडिवेप्पा हंचीनाळ यांनी मार्केट पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रणय रत्नाकर शेट्टी (रा. पाईपलाईन …
Read More »बीसीसीआयमध्ये सावळा गोंधळ! ना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव, ना मोठा रेकॉर्ड आणि तेच निवडतात भारतीय क्रिकेट टीम!
नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की निवडकर्त्यांकडे ना दृष्टीकोन आहे, ना खेळाचे सखोल ज्ञान आहे, ना क्रिकेटची समज आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघाच्या निवड समितीच्या अनुभवावर प्रश्न उपस्थित होत आहेत. चेतन शर्मा यांना हटवल्यानंतर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta