Monday , March 9 2026
Breaking News

Belgaum Varta

तांदूळ निर्यातीवर निर्बंध! उकड्या तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क

  नवी दिल्ली : केंद्र सरकारने उकड्या तांदळावर तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क लागू केलं आहे. सरकारने उकड्या तांदळावर म्हणजेच पारबॉईल्ड तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बासमती तांदूळ आणि उकड्या तांदळाच्या निर्यातीवर नवी निर्बंध लागू केले …

Read More »

घरफोडी प्रकरणी एकास अटक; 10 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त

  बेळगाव : समर्थनगर येथे गेल्या दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात मार्केट पोलिसांना यश आले असून एका चोरट्याला गजाआड करून त्याच्याकडील सुमारे 10 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव यासीन हासिम शेख (वय 23, रा. निप्पाणी जि. बेळगाव) असे आहे. समर्थनगर …

Read More »

झेंडा चौक सार्व. गणेशोत्सव मंडळ अध्यक्षपदी अमित किल्लेकर

  बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ (झेंडा चौक) मार्केट बेळगाव या शतायुषी मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी अमित किल्लेकर, सेक्रेटरीपदी राजू हंगिरगेकर व खजिनदारपदी अजित सिद्दण्णावर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. लोकमान्य टिळकांच्या हस्ते 1905 साली स्थापन झालेल्या आणि गेली 119 वर्षे सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या बेळगावातील मानाच्या …

Read More »

निपाणीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील दलाल पेठ येथे युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. केशव किरण शिंदे (वय २४ रा. जत्राटवेस, निपाणी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक माहिती अशी, केशव हा आपल्या वडिलांसोबत हँडग्लोज विक्रीचा व्यवसाय करत होता. गणेश …

Read More »

कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक बोलवा

  खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून शरद पवार यांना साकडे बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई व माजी आमदार दिगंबर पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी कृषी मंत्री तसेच माजी संरक्षण मंत्री श्री. शरद …

Read More »

तामिळनाडूत लखनऊ-रामेश्वर रेल्वेला भीषण आग, 10 प्रवाशांचा मृत्यू; तर 25 जण जखमी

  चेन्नई : तामिळनाडूच्या मदुराईमध्ये लखनऊ-रामेश्वर या रेल्वे गाडीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मदुराई यार्ड जंक्शनवर गाडी थांबवली तेव्हा आग लागली आहे. त्यानंतर काही प्रवाशांनी बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर …

Read More »

गर्लगुंजी -इदलहोंड रस्त्याची दयनीय अवस्था

  खानापूर : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी -इदलहोंड या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या पाच वर्षात या रस्त्याच्या दुरूस्तीकडे लोकप्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या गर्लगुंजी-इदलहोंड रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यातही या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले. त्यामुळे डांबरीकरणाचा पत्ताच नाही. गर्लगुंजी-इदलहोंड रस्त्यावरून नेहमी वीटा, …

Read More »

तुकाराम को-ऑप. बँकेला ६७ लाख रुपयांचा निव्वळ नफा : प्रकाश मरगाळे

  बेळगाव : तुकाराम को-ऑप. बँकेने गत आर्थिक वर्षात ६७ लाख ७ हजार ७७० रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून सभासदांना १४ टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे. संस्थेची ७२ वी सर्वसाधारण सभा रविवारी (दि. २७) होणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी शुक्रवारी (दि. २५) पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, …

Read More »

कारखान्याच्या हितासाठी शेतकरी बचाव पॅनेलच्या उमेदवारांना निवडून द्या : रमाकांत कोंडूसकर

  बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शेतकरी बचाव पॅनेलच्या उमेदवारांनी शुक्रवारी (दि. २५) विविध गावांत प्रचार केला. त्यानंतर म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांची भेट घेण्यात आली. यावेळी कोंडुसकर यांनी कारखान्याच्या हितासाठी शेतकऱ्यांनी विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन केले. तानाजी पाटील आणि आर. आय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रयत संघटनेतर्फे हुबळी हेस्कॉमवर मंगळवारी मोर्चा

  निपाणी (वार्ता) : शेती पिकासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींना सलग १६ तास वीज पुरवठा व्हावा, आतापर्यंत शॉर्टसर्किटने जळालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला योग्य नुकसान भरपाई मिळावी, उघड्यावरील ट्रान्सफॉर्मर आणि फ्युज पेट्यांचा बंदोबस्त करावा, यासह विविध मागण्यांसाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे हुबळी हेस्कॉम कार्यालयावर मंगळवारी (२९) मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. …

Read More »