Monday , March 9 2026
Breaking News

Belgaum Varta

विश्वकर्मा सेवा संघाच्यावतीने विद्यार्थ्यांचा सत्कार

  बेळगाव : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळावा याकरिता विश्वकर्मा सेवा संघाच्या वतीने आठवी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेले सर्व विद्यार्थी हे खेळाडू असून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये खेळण्याकरिता प्रोत्साहन मिळावे आणि त्यांनी आपल्या भारताचे नाव उज्वल करावे हा हेतू ठेवून त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी या …

Read More »

“त्या” दोन्ही वृद्ध मृतदेहांची ओळख पटली!

  बेळगाव : बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिरानजीकच्या तलावात आज सकाळी आढळून आलेल्या त्या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली आहे. पोलिस तपासात दोघांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. दोघांच्या आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली तरी सर्वांच्या मनाला चटका लावणारी आहेत. चित्रलेखा सपार आणि विजय पवार अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत समजलेली …

Read More »

‘बीसीसीआय’तर्फे चेंबरच्या माजी अध्यक्षांचा सत्कार

  बेळगाव : देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे आयोजित चेंबरच्या माजी अध्यक्षांचा सत्कार समारंभ काल उत्साहात पार पडला. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (बीसीसीआय) क्रियाशील उत्साही अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल आणि त्यांच्या कार्यकारिणीने स्वातंत्र्य दिनानिमित्त काल मंगळवारी चेंबरच्या माजी अध्यक्षांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. …

Read More »

नंदीहळी येथे शहीद जवान नामफलकाचे अनावरण

    बेळगाव : नंदीहळी (ता. बेळगाव) येथे ग्रामपंचायत वतीने कन्नड शाळेच्या आवारात शहीद जवान विजयकुमार पाटील यांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यंदा केंद्र सरकारतर्फे मेरी माटी मेरा देश हे अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत मंगळवार दि. 15 रोजी ध्वजारोहण करून शहीद जवान तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या नामफलकाचे अनावरण करण्याचे …

Read More »

बैठकीची नोटीस मराठीतून न दिल्यामुळे तसेच नोटीस घरावर चिकटवल्याच्या विरोधात समिती नगरसेवकांचा ठिय्या!

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या आजच्या सर्वसाधारण बैठकीत पुन्हा एकदा मराठी भाषिकांवर प्रशासनाने दडपशाही केल्याचे दिसून आले आहे. बैठकीची नोटीस मराठीतून न दिल्यामुळे तसेच नोटीस घरावर चिकटवून गेल्याच्या विरोधात मराठी भाषिक नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले. यावेळी मराठी भाषिक भाजप नगरसेवकांनी मात्र मराठी भाषिक नगरसेवकांच्या मागणीकडे पाठ फिरविली. तर विरोधी …

Read More »

मुतगे येथील न्यू इंग्लिश स्कूलला मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अर्थसहाय्यातून गणवेश वितरण

  मुतगे : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मुतगे येथे मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अर्थसहाय्यातून गणवेश वितरण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. वाय. पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब काकतकर होते. प्रारंभी फोटो पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. कोंडसकोप …

Read More »

निपाणी नगरपालिका प्रशासनाचा आडमुठेपणा; नगरसेवकांचा आरोप

  निपाणी : निपाणी नगरपालिकेवर राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांना भगवा फडकविण्यापासून रोखून निपाणी नगरपालिका प्रशासनाने वादाची ठिणगी टाकली आहे. याबाबत “बेळगाव वार्ता”च्या प्रतिनिधीशी बोलताना नगरसेवक संजय सांगावकर म्हणाले की, निपाणी नगरपालिकेवर 1991 पासून भगवा फडकत आहे. तसा ठराव देखील सभागृहात मंजूर झाला होता. 1991 पासून दर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी व …

Read More »

कपिलेश्वर मंदिरजवळच्या जुन्या तलावात दोन मृतदेह आढळले!

  बेळगाव : बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिरजवळच्या  जुन्या तलावात दोन मृतदेह आढळून आले आहेत. बुडालेला मृतदेहांमध्ये एक पुरुष व एक स्त्री असल्याचे प्राथमिक दृष्ट्या आढळून येत आहे. बुधवार पहाटे कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या तलावामध्ये दररोज मुलं पोहायला जातात त्या पोहणाऱ्या मुलांना दोन मृतदेह पाण्यावरून तरंगत असल्याचे दिसले त्यानंतर याची …

Read More »

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

  कोयना धरणापासून 20 किमी अंतरावर धक्के कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज (16 ऑगस्ट) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के …

Read More »

सीमाभागातील विद्यार्थ्यांना दूरशिक्षणाची संधी

  बेळगाव : दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मार्फत प्रवेश प्रक्रिया 2023-24 साठी महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन शिबीर बेळगाव येथे पार पडले. सदरच्या शिबिराचे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. शिबिरासाठी शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. संजय कुबल प्रमुख पाहुणे …

Read More »