डॉ. स्नेहल पाटील : निपाणीतील हुतात्मा स्मारक येथे क्रांती दिन साजरा निपाणी (वार्ता) : प्रत्येक नागरिकाने देशासाठी योगदान दिले पाहिजे, आपले राष्ट्रीय कर्तव्य काय असते, आपण देशासाठी काय करु शकतो हे पाहिले पाहिजे. आसपासच्या परिसरात व देशात घडणाऱ्या प्रत्येक अप्रिय घटनांच्या संदर्भातदखल घेऊन त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे तरच खरे …
Read More »शाळांच्या विकासासाठी शाळा सुधारणा कमिटीने पुढाकार घेणे आवश्यक : गोपाळ देसाई
खानापूर : शाळांच्या विकासासाठी शाळा सुधारणा कमिटीने पुढाकार घेणे आवश्यक असून गावागावात बैठका घेऊन मराठी शाळांमध्ये विद्यार्थी वाढावेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने गुरुवारी खानापूर तालुक्यातील रामगुरवाडी, नागुर्डा, नागुर्डा वाडा, शेडेगाळी, हारुरी, ढोकेगाळी, …
Read More »‘इंडिया’ आघाडीविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
निवडणूक आयोगाकडे जाण्याचा कोर्टाचा सल्ला नवी दिल्ली: देशातील विरोधकांच्या 26 पक्षांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आव्हान दिले आहे. त्यासाठी विरोधकांनी आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिले आहे. विरोधकांच्या या आघाडीच्या इंडिया या नावाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम …
Read More »खानापूर शहराजवळील मलप्रभा नदीवरील पुलाची आमदारांनी घेतली दखल, मंत्र्याशी केली चर्चा
खानापूर : खानापूर तालुक्यातील खानापूर शहरालगत असलेल्या मलप्रभा नदीवरील पूल धोकादायक बनले आहे. या मलप्रभा नदीवर नव्याने पुल उभारणीसाठी भाजपचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी नुकताच दिल्ली येथे केंद्रीय अवजड रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी खानापूर तालुक्यातील रस्त्या संदर्भात तसेच महामार्गावरील समस्येबाबत तसेच मलप्रभा नदीवरील …
Read More »वन्यप्राण्याची शिकार करणाऱ्या दोघा आरोपींना अटक
खानापूर : खानापूर तालुक्यातील गोल्याळी वन विभागाअंतर्गत आवरोळी गावाच्या हद्दीत वन्यप्राण्याची शिकार करणाऱ्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोमनिंग रवळप्पा कुडोळी (वय 50) व प्रभू सध्दाप्पा कुडोळी (वय 38) यांना अटक करून या दोघांची रवानगी कारागृहात करण्यात आली. बेळगाव विभाग उपवन संरक्षण अधिकारी कल्लोळकर तसेच नागरगाळी उपविभाग सहाय्यक …
Read More »मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केली शहरातील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी!
बेळगाव : महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज सकाळी शहरातील विविध भागात भेट देऊन कचऱ्याच्या विल्हेवाटीची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सकाळी 5.30 वाजता त्यांनी सदाशिव नगर येथील वाहन शाखेत जाऊन वाहनांची तपासणी केली व वाहनचालकांची उपस्थिती तपासली. सर्व …
Read More »खानापूर तालुक्यात शिक्षकांच्या बदलीचा परिणाम; विद्यार्थी गेले बाहेर, स्वयंपाकीला केले कमी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. तालुक्याचे क्षेत्रफळ विस्ताराने मोठे त्यातच जंगलाने व्यापलेला तालुका असल्याने नुकताच खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळातील शिक्षकांच्या तालुका बाहेर व अतंर्गत तालुक्यात झालेल्या बदल्यामुळे तालुक्यातील जवळपास ३० शाळातून कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने पालकांनी विद्यार्थ्याचे भवितव्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना दुसरीकडे हलविण्याने विद्यार्थ्याची संख्या कमी …
Read More »अमित शाह खोट बोलले, राहुल गांधी यांच्यामुळेच माझं आयुष्य बदललं : कलावती बांदूरकर
यवतमाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना यवतमाळ जिल्ह्यातील कलावती बांदूरकर यांनी मदत केल्याचा दावा फेटाळला आहे. अमित शहा यांनी कलावती यांच्याबाबत जे वक्तव्य केलं, त्याला प्रत्युत्तर देताना कलावती यांनी मला मोदी किंवा भाजप सरकारमुळे काहीच मिळालं नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामुळेच माझं आयुष्य बदललं, अशी माहिती दिली …
Read More »मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, दोषींना सोडणार नाही, मणिपूरवासियांच्या मागे देश ठामपणे उभा; नरेंद्र मोदींचा विश्वास
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये जे काही चाललं आहे ते दुर्दैवी असून दोषींना कडक शिक्षा देण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सांगितलं. मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, मणिपूरच्या मागे देश ठाम उभा आहे असंही ते म्हणाले. मणिपूरची आजची स्थिती ही काँग्रेसच्या काळात निर्माण झाल्याचा आरोपही मोदींनी केला. …
Read More »शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी तातडीने अनुदान उपलब्ध करावे : खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील अनेक मराठी शाळांच्या इमारतींची पडझड झाली आहे. त्यामुळे विद्यार्थांना त्रास सहन करावा लागत असल्याने त्यामुळे शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी तातडीने अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आली आहे. तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पावसाने नुकसान झालेल्या विविध शाळांची पाहणी केली तसेच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta