दहावी परीक्षेत मिळवले ९७ टक्के गुण; वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात आपली मुले शैक्षणिक क्षेत्रात अहवाल मानांकन मिळवावेत या उद्देशाने अनेक पालक विविध प्रकारच्या शिकवण्यावर अभ्यासावर भर देतात. पण अशा प्रकारची घरची कोणतीही पार्श्वभूमी नसताना शेंडूर येथील दयानंद सावंत या निपाणी शहरात खाद्यपदार्थाचा गाडा …
Read More »गोधोळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील गोधोळी ग्राम पंचायतीत मनरेगा व रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी गोधोळी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी काल तालुका पंचायतीचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर EO, खानापूरचे तहसीलदार, जिल्हाधिकारी बेळगाव, तसेच जिल्हा परिषदेचे चीफ सेक्रेटरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तालुका पंचायतीच्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसरना निवेदन देताना भाजपा …
Read More »शिवराज्याभिषेक दिन : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज रायगडावर संपन्न होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री, आमदार, खासदार या सोहळ्याला उपस्थित आहेत. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या …
Read More »छत्रपती शिवाजी महाराज हे धैर्य आणि शौर्याचे प्रतिक! पंतप्रधान मोदींच्या शिवराज्याभिषेक दिनी मराठीतून शुभेच्छा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने मराठीतून शुभेच्छा दिल्या आणि शिवरायांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे धैर्य आणि शौर्याचे प्रतिक आहेत. त्यांचे आदर्श हे महान प्रेरणास्रोत आहेत, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले. ”छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे झाल्यानिमित्ताने तुम्हाला …
Read More »रविवारी कावळेवाडीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा
बेळगाव : दरवर्षी प्रमाणे कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयतर्फे येत्या रविवार दि. 4 जून 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता दहावी परीक्षेतील विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. हिंडलगा ग्रा. पं. सदस्या रेणू गावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास प्रमुख …
Read More »हॉकी बेळगाव-यश इव्हेंटस पुरस्कृत हॉकी प्रशिक्षण शिबिराची सांगता
बेळगाव (प्रतिनिधी) : केवळ हॉकी खेळण्यासाठीच नव्हे तर शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी तसेच विविध स्तरांवर स्वतःचे प्रतिनिधित्व सिद्ध करण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने हॉकी बेळगावने मुला-मुलींसाठी मोफत हॉकी प्रशिक्षण सुभाषचंद्र बोस (लेले मैदान) टिळकवाडी येथे शिबिराचे आयोजन केले होते. याचा लाभ ५० मुला-मुलींनी घेतला, असे अध्यक्ष घुळाप्पा होसमनी यांनी …
Read More »बी. के. कॉलेजमध्ये 5 रोजी सत्कार, व्याख्यानाचे आयोजन
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव, ज्योती करियर अकॅडमी बेळगाव, भाऊराव काकतकर महाविद्यालय, ज्योती पदवी पूर्व महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघटना बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवार दि. 5 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयएएस 2023-24 परीक्षा उत्तीर्ण परीक्षार्थींचा सत्कार सोहळा, मार्गदर्शन शिबिर आणि व्याख्यान अशा संयुक्त …
Read More »ब्रह्माकुमारीतर्फे बेळगावात तंबाखू विरोधी दिनाचे आचरण
बेळगाव : महांतेश नगर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या वतीने बुधवारी बेळगाव रेल्वे स्थानकावर जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव उपविभागाच्या प्रमुख राजयोगिनी बी. के. अंबिका यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माउंट आबू येथील ब्रह्मकुमारी मुख्यालयातून आलेल्या बी. के. अच्युत यांनी …
Read More »गोल्याळी अपघातातील युवकाचा मृत्यू ; दोन युवतीना आले अपंगत्व, एकजण सुखरूप
खानापूर : बिडी आळणावर या राजमार्गावरील गोल्याळी वन खात्याच्या चेक पोस्ट नाक्यापासून जवळ असलेल्या वळणावर दुचाकीची बसला धडक बसून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा दुपारी उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या युवकाचे नाव यल्लाप्पा प्रकाश हुन्नूर (वय 25) असे आहे. तर उर्वरित तिघांच्यावर उपचार सुरू असून यापैकी पल्लवी मारुती …
Read More »कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन!
बेळगाव : हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून पुन्हा नव्याने लढा उभा करण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करताना केला. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात गुरुवारी सकाळी कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील नऊ हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. सीमा भागातील कन्नड सक्ती हटावी यासाठी 1 जून 1986 रोजी मोठ्या प्रमाणात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta