बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात एकूण 76.70% मतदान झाले असून सर्व ईव्हीएम आरपीडी कॉलेजमधील स्ट्राँगरुममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. राज्यासह बेळगाव जिल्ह्यात बुधवारी विधानसभा निवडणुकीचे मतदान अखेर सुरळीत पार पडले. उन्हाच्या झळा सोसत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण जिल्ह्यात …
Read More »निवडणुकीचा महापालिकेच्या 10 अधिकाऱ्यांना फटका
बेळगाव : यंदाची विधानसभा निवडणूक महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली असून पालिकेच्या 10 अधिकाऱ्यांची वाहन सुविधा या निवडणुकीमुळे काढून घेण्यात आली आहे. त्यांची वाहने निवडणुकांसाठी वापरली जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी बेळगाव महापालिकेतील 10 अधिकाऱ्यांची वाहने तात्पुरती काढून घेण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना गेल्या महिन्याभरापासून महापालिकेत किंवा अन्य कार्यालयीन …
Read More »कुस्तीपटूंचा ‘काळा दिवस’, बृजभूषण सिंह यांना विरोध कायम
नवी दिल्ली : भाजपाचे आमदार तसेच भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करत जंतर-मंतर या ठिकाणी सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा आजचा 19 वां दिवस आहे. जतंर-मंतर याठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला कुस्तीपटू भाजपा आमदारांच्या विरोधात काळा दिवस म्हणून साजरा करत आहेत. कुस्तीपटूंची विरोधाची ही पद्धत सोशल मीडियावर …
Read More »शिंदे सरकारला ‘सर्वोच्च’ दिलासा : ‘अपात्रते’चा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांच्या ‘कोर्टात’
नवी दिल्ली : देशासह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज (दि.११) सर्वोच्च न्यायालयाने दिला. घटनापीठाने एकनाथ शिंदेसह १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, असे स्पष्ट केले. या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच गेल्या १० महिन्यांहून अधिक काळ सुरु …
Read More »बेळगावसह विविध जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता
बंगळुरू : राज्यातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. किनारी जिल्हे, सर्व दक्षिणेकडील अंतर्गत जिल्हे आणि अनेक उत्तरेकडील अंतर्गत जिल्हे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतील. बेळगाव, बागलकोट, धारवाड, गदग, हावेरी, कोप्पल, रायचूर, यादगिरी या उत्तरेकडील अंतर्गत जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल. चिकमंगळूर, कोडागु, मंड्या, …
Read More »महामार्ग रुंदीकरणाची व्यावसायिकांच्यावर कुऱ्हाड
युवक बेरोजगार : जगण्याचा प्रश्न गंभीर कोगनोळी: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार चे सापदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. यामुळे महामार्ग लगत असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील टोल नाक्यावर असणाऱ्या व्यावसायिकांना आपली व्यवसाय बंद करावे लागल्याने त्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून व्यावसायिक …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना ईडीचा समन्स
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने (अंमलबजावणी संचलनालय) उद्या 12 मे चा समन्स बजावला आहे. आयएल आणि एफएसच्या कथित घोटाळ्या प्रकरणी हा समन्स बजावण्यात आला आहे. जयंत पाटील यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. काय आहे आयएल आणि एफएस प्रकरण आयएल आणि एफएस या कंपनीच्या …
Read More »कर्नाटक विधानसभेसाठी 65.69 टक्के मतदान
बेंगळुरु : देशात लक्षवेधी ठरलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.10) सायंकाळी 5 वाजेपर्यंत 65.69 टक्के मतदान झाले. राज्यभरातील 58 हजार 545 मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणूकीमध्ये 5 कोटी 31 लाख 33 हजार 54 मतदार नोंदणी आहे. 224 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. …
Read More »निपाणी मतदारसंघात ईर्षेने मतदान!
गावागावात चुरस :टक्केवारी वाढीसाठी सर्वांचेच प्रयत्न निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यापासून निपाणी मतदार संघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमुळे ग्रामीण भागात बुधवारी (ता. १०) मतदानादिवशी सकाळी ७ वाजल्यापासूनच कडक ऊन असतानाही सर्वच मतदान केंद्रावर चुरशीने मतदान होत होते. काही ठिकाणी दिवसभर ऊन …
Read More »सदलगा येथे तीन पर्यंत 57.5% टक्के मतदान; महिलांचा मतदानात मोठा सहभाग
सदलगा : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिकोडी-सदलगा मतदार संघातील सदलगा शहरात एकूण १४ बूथमधून सुमारे 57 टक्के मतदान झाले आहे. महिलांचा मतदानामध्ये लक्षणीय सहभाग जाणवत होता. ज्या बूथमध्ये महिला आणि युवा मतदार जास्ती मतदान करणारे आहेत अशा बूथना अनुक्रमे पिवळ्या आणि गुलाबी फुग्यांची कमान लावली होती. मतदारांना उन्हाचा त्रास होऊ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta