Wednesday , June 3 2026
Breaking News

Belgaum Varta

मत्तिवडे मुख्य रस्त्याची दुरावस्था

  वाहनधारकांतून नाराजी : साईड पट्टीचे काम करा कोगनोळी : मत्तिवडे तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्गापासून ते गावापर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसापासून दुरावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर लहान मोठे अपघात घडत आहेत. यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी ताबडतोब लक्ष देऊन …

Read More »

राज्यात जात जनगणनेचा अहवाल जाहीर करण्यासाठी दबाव

  बंगळूर : जात जनगणनेचा अहवाल जाहीर करण्यासाठी दबाव आणला जात असून, यावरून राज्याच्या राजकारणात प्रचंड वादळ निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जात जनगणनेचा अहवाल लवकरात लवकर मंजूर करू असे सांगितले असले तरी ही प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. कांतराज आयोगाने तयार केलेला सामाजिक व आर्थिक जात …

Read More »

विद्युत मोटार जोडत असताना विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

  निपाणी (वार्ता) : शेतातील विहिरी जवळ असलेल्या विद्युत मोटर पेटीमध्ये कनेक्शन देण्याचे काम करत असताना विजेचा धक्का बसून वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.३) पट्टणकुडी येथे घडली. उमेश श्रीकांत पाटील (वय ४०, मुळगाव बेनाडी सध्या रा. सुतार गल्ली, पट्टणकडी) असे मृताचे आहे. उमेश पाटील हे वायरमन म्हणून बऱ्याच वर्षापासून …

Read More »

पास्टोली गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्याजवळील पास्तोली गावात एका ३८ वर्षीय नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून कोल्हापुरात पळ काढला, अशी फिर्याद मुलीच्या कुटुंबीयांनी मंगळवारी पोलिसांत दिली. या संदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार, भीमगड अभयारण्यातील पास्तोली गावातील शाहू गावडे या नराधमाने काही दिवसांपूर्वी मुलीवर अत्याचार केला होता. शाहू गावडे याच्याविरुद्ध खानापूर …

Read More »

पालकमंत्री सतीश जारकीहोळीना धमकीपत्र देणाऱ्याला कठोर शिक्षा द्या

  दलित संघटनांचे आंदोलन: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना धमकीपत्र देणाऱ्या विरोधात कठोर शिक्षा व्हावी. शिवाय याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी विविध दलित संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दोन दिवसांपूर्वी अनोळखी व्यक्तींनी पत्र पाठवून जिल्हा पालकमंत्री सतीश जरकीहोळी यांना थेट धमकी दिली आहे. एवढी …

Read More »

निपाणीतील युवकाचा भुदरगड येथे खून; आर्थिक व्यवहारातून खुनाचा संशय

  निपाणी (वार्ता) : येथील युवकाला घरातून बोलावून घेऊन जाऊन किल्ले भुदरगड येथे खून केल्याची घटना मंगळवारी (ता.३) सकाळी उघडकीस आली. राहुल शिवाप्पा सुभानगोळ (वय ३२ रा. मुळ गाव मसोबा हिटणी ता. हुक्केरी, सध्या रा. हौसाबाई कॉलनी साखरवाडी, निपाणी) असे या युवकाचे नाव आहे. या खुनामध्ये मुंबई आणि निपाणी येथील …

Read More »

केसीआर यांना एनडीएमध्ये यायचे होते : तेलंगणांमध्ये पंतप्रधान मोदींचा गौप्यस्फोट

  हैदराबाद : तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी निजामाबादमधील जाहीर सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हायचे होते, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की,”तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे भारतीय जनता पक्षाच्या कट्टर …

Read More »

संघटितपणे संविधानाचा हक्क मिळवणे चूकीचे कसे? : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  बेळगावातील राष्ट्रीय समावेश मेळाव्यात सत्कार स्विकाताना व्यक्त मत बेळगाव (प्रतिनिधी) : देशातील सर्व समाज एक सारखेच असून, आजपर्यंत आम्हीं कधीही जातीभेद केला नाही. सर्व समाजाला बरोबर घेऊनच चाललो आहोत. सरकार संविधानाच्या चौकटीतच सर्व समाजाना एकच न्याय दिला जाईल, असे सांगत कोणत्याही समाजाने संघटिपणे हक्क मागितला तर त्यात चुकीचे काय …

Read More »

“तुमच्या ४१ अधिकाऱ्यांना माघारी बोलवा, नाहीतर…”, भारताचा कॅनडाला इशारा

  नवी दिल्ली : गेल्या आठवड्याभरापासून खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरण चर्चेत आलं आहे. कॅनडामध्ये झालेल्या या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी थेट देशाच्या संसदेत केला होता. त्यावरून द्विपक्षीय संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. आत्तापर्यंत दोन्ही देशांनी एकमेकांच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली …

Read More »

दिल्ली -बेळगाव विमानसेवा 5 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू

  बेळगाव : वर्षभरापासून बंद पडलेली दिल्ली -बेळगांव विमानसेवा आता पुन्हा 5 ऑक्टोबर पासून नव्याने सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे बेळगाव ते मुंबई ही विमानसेवा येत्या 15 ऑक्टोबर पासून बेळगावकरांच्या सेवेत असणार आहे. इंडिगो विमान कंपनीने बेळगाव ते दिल्ली विमानसेवा सुरू केली असून या कंपनीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नवी दिल्ली ते …

Read More »