Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

पक्ष जे काम देईल ते प्रामाणिकपणे करेन ; डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : खानापूर मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि भाजपच्या बेळगाव जिल्हा ग्रामीण महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्ष जे काम देईल ते प्रामाणिकपणे करू, असे सांगितले आहे. खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मी संपूर्ण …

Read More »

मध्यवर्ती शिवजयंती मंडळ, राजा शिवछत्रपती स्मारकातर्फे उद्या शिवजयंती

  खानापूर : शहरात पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. येथील मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने ९७ वी शिवजयंती ज्ञानेश्वर मंदिरात साजरी करण्यात येणार आहे. शनिवार दि. २२ रोजी दुपारी १२ वा. शिवजन्म सोहळा तर सायंकाळी ५ वा. पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवस्मारक ट्रस्टच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे शिवस्मारकात सकाळी १० वा. …

Read More »

म. ए. समितीच्या प्रचाराला नेते पाठवा; मात्र राष्ट्रीय पक्षांचा प्रचार नको

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याना मध्यवर्ती समितीचे पत्र बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून म. ए. समितीच्या उमेदवारांनी सर्व ताकदीनिशी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता त्यांच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या प्रचारासाठी नेतेमंडळींनी उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे. बेळगावात येणाऱ्या नेत्यांची नावे द्यावीत, याचबरोबर राष्ट्रीय पक्षांच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील …

Read More »

गजबरवाडी-सुळकूड मार्गावर महाराष्ट्रातून वाहतूक

  अवैध वाहतूक रोखण्यासाठी तपास नाक्याची गरज कोगनोळी : कर्नाटक विधानसभा निवडणूक १० मे रोजी होणार असून २९ मार्चपासून आचारसंहिता लागू केली आहे. अवैध वाहतूक रोखण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अनेक ठिकाणी तपास नाके उभे केले आहेत. मात्र गजबरवाडी-सुळकूड मार्गावर महाराष्ट्रातून चोरट्या मार्गाने वाहने येत असल्यामुळे या ठिकाणी तपास नाका सुरु करण्याची मागणी …

Read More »

उद्या पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार; 27 मे रोजी मिरवणूक

  श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाची बैठक संपन्न बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाची बैठक श्री. नेताजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. शनिवार दिनांक 22 एप्रिल रोजी पारंपारिक शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे तरी सर्व पदाधिकारी व शिवभक्तानी शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे …

Read More »

अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन शेतकऱ्यांचा मृत्यू : दोघे जखमी

  खानापूर : तालुक्यातील गोधोळी गावाच्या हद्दीत धारवाड रामनगर राज्य महामार्गावर शेतात जाणाऱ्या चार शेतकऱ्यांवर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोन शेतकरी जागीच ठार तर एकाचा केएलई मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. गोधोळीचे चार शेतकरी त्यांच्या शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी जात होते. गावाच्या शिवारात पायी चालत शेताकडे जात असताना …

Read More »

यमकनमर्डी मतदारसंघातील अधिकृत उमेदवार मारुती नाईक यांचा अर्ज दाखल

  बेळगाव : यमकनमर्डी मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. मारुती तिप्पन्ना नाईक, सेवा निवृत्त सैनिक यांनी अर्ज दाखल केला. तब्बल १५ वर्षानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने यमकनमर्डी संघातून आपला अधिकृत उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे यमकनमर्डी मतदार संघातील मराठी जनतेच्या मनात नव चैतन्य निर्माण झाले आहे. यावेळी उमेदवार श्री. …

Read More »

रमाकांत कोंडुस्कर व ऍड. अमर येळ्ळूरकर यांचे शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल

  बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिण मतदार संघातून रमाकांत कोंडुस्कर तसेच उत्तर मतदार संघातून ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी आज दुपारी भव्य मिरवणुकीद्वारे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्र एकीकरण समितीला लागलेले दुहीचे ग्रहण संपल्यामुळे मराठी भाषिकांमध्ये नवचैतन्य पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे याची प्रचिती आज …

Read More »

अखेर खानापूर काँग्रेस युवा अध्यक्ष इरफान तालिकोटी यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका काँग्रेसमध्ये अखेर दोन गट होऊन दुसऱ्या गटातून काँग्रेसचे तालुका युवा अध्यक्ष इरफान तालिकोटी यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत गुरूवारी दि. २० रोजी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारीचा अर्ज निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद यांच्याकडे दाखल केला. इरफान तालिकोटी हे काँग्रेसचे जुने नेते. त्यांनी तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी …

Read More »

लष्कराच्या ट्रकला भररस्त्यात भीषण आग, पाच जवानांचा मृत्यू; जम्मूमधील घटना

  नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या वाहनाला भीषण आग लागली. या आगीमुळे पाच जवानांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. पूंछमधील भिंबर गल्ली येथून तोटा गल्ली येथील लष्कराच्या ट्रकमधून रॉकेलची वाहतूक करण्यात येत होती. मात्र, चालत्या ट्रकला भररस्त्यात भीषण …

Read More »