Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

खानापूरात एलआयसी “एजंट डे” उत्साहात साजरा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील शुभम गार्डन हॉलमध्ये बेळगाव एलआयसी ऑफ इंडिया ब्रांच वन व सॅटलाईट ऑफिस खानापूर यांच्यावतीने एलआयसी “एजंट डे” उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सभेचे अध्यक्ष म्हणून एलआयसी एजंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून चंदगड येथील एम डी आर टी एजंट …

Read More »

आर.पी.डी. कॉलेजला नॅककडून ‘ए’ श्रेणी

  बेळगाव : साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीच्या राणी पार्वती देवी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाला नॅक त्रिसदस्यीय समितीने चौथ्या तपासणीतून ‘A’ ग्रेड (3.16 सीजीपीए) देऊन सन्मानित केले आहे. नॅक समितीने ८ आणि ९ डिसेंबर २०२२ रोजी महाविद्यालयाला भेट दिली होती. या समितीत कलिंगा विद्यापीठ, रायपूर- छत्तीसगडचे उपकुलगुरू डॉ. बायजू जॉन अध्यक्ष …

Read More »

हणबरवाडी ग्रामस्थांचा प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा

  पाटील मळ्याजवळ पुलाची मागणी : मागणी न मान्य झाल्यास रस्ता काम बंद कोगनोळी : राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे नागरिकांना येणे जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. व महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाडी-वस्तीवरील विद्यार्थी व नागरिकांना महामार्गावरून गावाकडे व गावातून पुन्हा महामार्गावरून निपाणी, कोल्हापूरकडे जाण्यासाठी मोठी …

Read More »

भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलही अडकला विवाहबंधनात!

  नवी दिल्ली : भारताचा खेळाडू के एल राहुल आपली प्रेयसी अभिनेत्री आथिया शेट्टीबरोबर विवाह बंधनात अडकला आहे. त्यातच आणखी एका भारतीय खेळाडूची विकेट पडली आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने लग्नगाठ बांधली आहे. अक्षर पटेलने प्रेयसीशी विवाह केला आहे. याचे फोटो समाजमाध्यमांत व्हायरल झाले आहेत. अक्षर पटेल आणि …

Read More »

एम. के. हुबळी येथील विजय संकल्प यात्रेसाठी बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे ; भाजपा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांचे आवाहन

  खानापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 28 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता एम. के. हुबळी येथे विजय संकल्प यात्रेसाठी उपस्थित राहणार आहेत. खानापूर, कित्तूर, बैलहोंगल आदी भागातून बहुसंख्य नागरिकांनी अमित शहा यांच्या जाहीर सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतच्यावतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून 74वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याच बरोबर आंबेडकर चौक येळ्ळूर या ठिकाणी येळ्ळूर ग्राम पंचायत उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर यांच्या वतीने ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्राम पंचायत सदस्य …

Read More »

खानापूरात संगोळी रायन्नाच्या बलिदान दिनानिमित्त रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

  खानापूर : खानापूर शहरात सालाबादप्रमाणे यंदाही खानापूर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर संगोळी रायन्नाच्या बलिदान दिनानिमित्त गुरूवारी दि. २६ जानेवारी रोजी आयोजित भव्य बाईक रॅलीला युवकाचा भव्य प्रतिसाद लाभला. गुरूवारी सकाळी रॅलीचे सुरूवात खानापूर शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून करण्यात आली. प्रारंभी …

Read More »

कुन्नूरमध्ये रविवारपासून ‘अरिहंत चषक’ शुटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा

उत्तम पाटील : आंतरराष्ट्रीय १६ संघ सहभागी निपाणी (वार्ता): कुन्नूर (ता. निपाणी) येथील श्री. दत्त शूटिंग व्हॉलीबॉल क्लबतर्फे कुन्नूर येथे अरिहंत चषक शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.२९) दुपारी २ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील १६ संघ सहभागी झाले आहेत. सोमवारी (ता.३०) रात्री अंतिम सामना …

Read More »

देशाला समृद्ध बनविण्यासाठी संविधानाचे पालन आवश्यक : डॉ. डी. एम. मुल्ला

    बेळगाव : बेळगाव वडगांव विष्णू गल्लीतील निजामिया बैतूलमाल आणि वेलफेर ट्रस्टतर्फे भारतीय गणराज्योत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. यावेळी मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. डी. एम. मुल्ला हे प्रमुख अतिथीपदी उपस्थित होते. तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी वडगांव निजामिया जामिया सुन्नत जमातचे अध्यक्ष सलीम सय्यद …

Read More »

श्री नामदेव दैवकी संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : सालाबाद प्रमाणे 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन सकाळी 8 वाजता श्री संत नामदेव मंदिरमध्ये साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री. नारायणराव काकडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले आहे. ध्वजवंदनानंतर समाजातील प्रतिष्ठित, S K टेलर्स चे मालक श्री. सचिन काकडे यांनी 60 फुट उंच मोदी कोट शिवून जागतिक …

Read More »