Sunday , July 26 2026
Breaking News

मराठी मतदार याद्या वेबसाईटवर उपलब्ध : म. ए. युवा समितीच्या मागणीला यश

Spread the love

 

बेळगाव : जानेवारी महिन्यात बेळगावच्या प्रशासनाने अंतिम मतदार यादी फक्त कन्नड भाषेत प्रसिद्ध केली होती, पण मराठी भाषेत केली न्हवती त्यानंतर ८ जानेवारीला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार म. ए. युवा समितीने दाखल करताच प्रशासनाने मराठी भाषेत याद्या उपलब्ध करून दिल्या होत्या पण त्या आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध केल्या नाही. त्यामुळे दिनांक ९ मार्च २०२३ रोजी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदन सादर केले होते. प्रत्येक मराठी भाषिकांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आपले नाव तपासून पाहण्यास शक्य होत नाही, ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने सांगली जत मध्ये कानडी भाषिक बहुसंख्य असलेल्या भागात कन्नड भाषेत मतदार याद्या उपलब्ध करून देण्यात येतात आणि त्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध केल्या जातात त्याच पद्धतीने बेळगावात देखील मराठी याद्या ऑनलाईन उपलब्ध कराव्यात अशी मागणी निवेदनद्वारे केली होती.
आज बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मराठी मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध केल्या असून युवा समितीच्या पाठपुराव्याने हे यश आले आहे. उपलब्ध करून देण्यात आलेल्या मराठी मतदार याद्यात बऱ्याच मतदाराच्या आणि गावाच्या नावांमध्ये चुका आढळून आल्या असून त्या दुरुस्ती संदर्भात निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करणार असल्याचे युवा समितीच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *