खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर लायन्स क्लबच्यावतीने शनिवारी दि. २१ रोजी खानापूर वनविभागाच्या विश्रामधामात सामाजिक कार्यकर्ते, कदंबा फाऊंडेशनचे अध्यक्ष, भाजप नेते जाॅर्डन गोन्सालवीस यांचा सत्कार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विशेष मार्ग दर्शक म्हणून बेळगाव जिल्हा ३१७ बी चे रिजन चेअरपर्सन एमजेएफ ऍड. गुरूदेव सिध्दापूरमठ उपस्थित होते. तर खानापूर लायन्स …
Read More »खुल्या खो-खो स्पर्धेचे उद्घाटन
बेळगाव : ब्रह्मलिंग स्पोर्ट्स बेनकनहळ्ळी यांच्या वतीने आयोजित ओपन खो- खो स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. एम. चौगुले आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर यांनी केले. यावेळी आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, श्रीराम सेना हिंदुस्थानचे तालुकाप्रमुख भरत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. खेळाडूंच्या जर्सीचे अनावरण दरम्यान, …
Read More »तब्बल दीड महिन्याच्या कालावधीनंतर खानापूर तहसीलदार पदी गोठेकर यांची नियुक्ती
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तहसील कार्यालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी बाबतीत चर्चेत असते. सध्या गेल्या दीड महिन्यापासून खानापूर तहसील कार्यालयात तहसीलदार पद रिक्त होते. त्यामुळे नुकताच खानापूर तहसीलदार म्हणून बेळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयातील डीव्हीडीसी अधिकारी व्ही. एम. गोठेकर यांची नियुक्ती करण्यात आली. नुतन तहसीलदार व्ही. एम. गोठेकर यांनी …
Read More »मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
बेळगाव: : रविवार दिनांक 22 रोजी मराठा लाईट इन्फंट्री मध्ये भारतीय सेनादला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित साधून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय सैनिक दलात कार्यरत असलेले जवान, माजी जवान, नागरिक व शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. रविवार दिनांक 22 रोजी सकाळी 6 वाजता …
Read More »अमेरिकन सैन्याचा सोमालियात एअर स्टाईक, अल शबाबचे 30 सैनिक ठार
न्यूयॉर्क : सोमालियामध्ये सरकारी सैनिकांना मदत करणाऱ्या अमेरिकन हवाई हल्ल्यात सुमारे ३० इस्लामी अल-शबाब दहशतवादी ठार झाले आहेत, असे अमेरिकन सैन्याने म्हटले आहे. हा हल्ला शुक्रवारी (दि.२१) सोमालियातीस गलकाडच्या मध्य सोमाली शहराजवळ झाला. राजधानी मोगादिशूच्या ईशान्येस सुमारे 260 किमी (162 मैल) अंतरावर असलेल्या गालकाड शहराजवळ हा हल्ला झाला. गेल्या …
Read More »भारताचा न्यूझीलंडवर 8 गडी राखून विजय, मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी
रायपूर : येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय मैदानात भारतानं न्यूझीलंडवर 8 गडी राखून दमदार असा विजय मिळवला आहे. सामन्यात आधी अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या 108 धावांत न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाला भारतानं बाद केलं. त्यानंतर 109 धावांचं माफक लक्ष्य केवळ 20.1 ओव्हरमध्ये दोन गडी गमावून पूर्ण केलं आणि 8 विकेट्सनी …
Read More »२६ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात म. मं. महाविद्यालयातील स्वयंसेवकांचा सहभाग
खानापूर : मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या वतीने हुबळी येथे आयोजित २६ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात दोन विद्यार्थ्यानी सहभाग दर्शविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पाडलेल्या या कार्यक्रमात युवा पिढीला उद्देशून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात …
Read More »विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाला प्राधान्य द्यावे : डॉ. सोनाली सरनोबत
बेळगाव : विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाला प्राधान्य दिले पाहिजे. मैदानी खेळाची जागा व्हिडीओ गेमने घेतली तर मैदानाची जागा टोलेजंग इमारतींनी. त्यामुळे सध्याची पिढी मैदानी खेळापासून वंचित आहे, असे मत डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले. त्या पंडित नेहरू हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा नुकताच पार पडल्या त्या कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाला …
Read More »क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का! लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधून क्रिकेटला डच्चू
नवी दिल्ली : क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यासाठी वाईट बातमी आली आहे. २०२८ मध्ये होणार्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) या प्रकरणाची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) दिली आहे. या बाबतीत आयसीसीही असहाय दिसली आहे. जय शाह …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायत ग्रंथालयाला पुस्तकांची भेट
बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या ग्रंथालयासाठी येळ्ळूर गावातील तरुण श्री. चेतन कल्लाप्पा हुंदरे, श्री.विक्रम परशराम कुंडेकर आणि कु.महेश प्रकाश पाटील यांच्याकडून पुस्तके भेट देण्यात आली. या मध्ये स्पर्धात्मक परीक्षेसाठी लागणारी तयारी, इंग्रजी स्पीकिंग, शेअर मार्केट, आर्थिक, अध्यात्मिक आणि देशातील महान कॉर्पोरेट गुरुंबद्दल माहिती देणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे. यावेळी येळ्ळूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta