Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

‘भरतेश’चा हीरकमहोत्सव १७ पासून

    डॉ. जिनदत्त देसाई : भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन बेळगाव : उत्तर कर्नाटकातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था भरतेश एज्युकेशन ट्रस्ट यंदा संस्था ६० व्या वर्षांत पदार्पण करत आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जिनदत्त देसाई यांनी सांगितले. शुक्रवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. १७ जानेवारीपासून विविध …

Read More »

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौकातील कामाची पाहणी

  बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले छत्रपती संभाजी राजांच्या मूर्तीचे काम अनेक दिवसापासून चालले आहे. त्याची शुक्रवारी सायंकाळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण गावडे व मराठा समाजाचे नेते किरण जाधव आणि शिवसेना उपजिल्हाध्यक्ष बंडू केरवाडकर यांनी कामाची पाहणी करून लवकरात लवकर काम पूर्ण करून लोकार्पण करण्यात यावे, असे आवाहन छत्रपती संभाजी …

Read More »

खानापूर समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची मराठी पत्रकार संघ, वार्ता कार्यालयाला सदिच्छा भेट!

  बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनियुक्त अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघ, बेळगाव वार्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. प्रारंभी अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या हस्ते मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. …

Read More »

कराटे स्पर्धेमध्ये खानापूरला सुयश

  खानापूर : रविवार दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी बेळगाव पिरनवाडी येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात झालेल्या दुसऱ्या ओपन स्पर्धेत कराटे चॅम्पियनशिप मध्ये 300 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या कराटे स्पर्धेमध्ये खानापूर कराटे अकादमी 5 स्पर्धकांनी भाग घेतला होता यामध्ये कुमारी निहिरा परशराम नाथ हिला बेळगाव जिल्हा गोल्ड मेडल, …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, हिंडलगा यांचा स्मशानभूमी स्वच्छतेचा अनोखा उपक्रम

  बेळगाव : हिंडलगा येथे रविवारी संक्रांतीच्या सणादिवशी युवा समिती, हिंडलगा यांनी हिंडलगा स्मशानभूमीत वाढलेली झाडे झुडपे, साचलेला कचरा काढून स्वच्छता करण्यात आली. सर्व कचरा जमा करुन जाळण्यात आले. याचप्रमाणे दोन दिवसांपूर्वी रेणूका मंदिर परिसरातील कचरा काढून स्वच्छ करण्यात आला. या कार्यासाठी युवा आघाडी अध्यक्ष विनायक पावशे, अमित हेगडे, रामचंद्र …

Read More »

खानापूर येथे दुकान व घराला आग; लाखोंचे नूकसान

  खानापूर : चिरमुरकर गल्ली खानापूर येथील कौलारु घर व घरात असलेल्या टेलर दुकानाला आग लागून मोठे नूकसान झाले आहे. अग्निशमन दल व नागरिकांनी सदर आग विझविली आहे. चिरमुरकर गल्ली ज्ञानेश्वर मंदिरच्या बाजूला दिलीप येळ्ळूरकर यांच्या घरातील पुढील भागात असलेल्या भाड्याने दिलेल्या दुकानात रामगुरवाडी ता. खानापूर येथील नामदेव नारायण माळवे …

Read More »

रानडुकराच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी जखमी

  खानापूर : रानडुकराच्या हल्ल्यात खानापूर तालुक्यातील चापोली गावचा 70 वर्षीय वृद्ध शेतकरी जखमी झाला आहे. त्याच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गंगाराम धुळू शेळके असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. गंगाराम हे गवळीवाड्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या शेतात जात होते. काही अंतरावर गेले असतानाच रानडुकराने त्यांच्यावर अचानक …

Read More »

नेपाळमध्ये विमान कोसळलं, 40 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

  काठमांडू : नेपाळच्या यति एअरलाईन्सचं विमान कोसळलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोखरा परिसराजवळ विमान दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनाग्रस्त विमानात 72 जण होते. 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबरचा यामध्ये समावेश आहे. विमान अपघातामध्ये आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या घटनेचे व्हिडीओ …

Read More »

नितीन गडकरी यांना फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी जयेश पुजारी याची कसून चौकशी

  बेळगाव : नितीन गडकरी यांना फोनवरून धमकी दिल्या प्रकरणी जयेश पुजारी याची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून एक डायरी जप्त करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांचे पथक शनिवारपासून हिंडलगा कारागृहात चौकशी करत आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केल्याप्रकरणी तपास करण्यासाठी बेळगावातील हिंडलगा कारागृहात नागपूर पोलीस शनिवारी रात्री …

Read More »

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 19 फेब्रुवारी रोजी

    बेळगाव : 18 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार (ता. 19) फेब्रुवारी रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाची बैठक रविवार (ता. 15) रोजी सकाळी 11-00 वाजता झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे हे होते. प्रारंभी साहित्य संघाचे सचिव डॉ. तानाजी पावले …

Read More »