बेळगाव : “रद्द करा रद्द करा, रिंग रोड रद्द करा” “नाही नाही कधीच नाही रिंग रोडसाठी जमीन देणार नाही” अशा जोरदार घोषणा देऊन बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय समोर जोरदार निदर्शने केली. यावेळी रिंगरोडसाठी शेतकऱ्यांचा सरकार विरोधी यल्गार दिसून आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खात्याने बेळगाव …
Read More »मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली 28 फेब्रुवारीला “चलो मुंबई”
बेळगाव : सीमाप्रश्न निर्णायक वळणावर आलेला असताना निद्रिस्त महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली “चलो मुंबई” हाक देण्यात आली आहे. येत्या 28 फेब्रुवारी दरम्यान सीमाभागातील हजारो सीमावासीय मुंबई येथे धरणे आंदोलन करणार असून यावेळी सीमावासीयांचे आधारस्तंभ माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. मध्यवर्ती …
Read More »कर्नाटकात भाजपची अवस्था होऊ शकते खराब!
नवी दिल्ली : 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीला वर्षभरापेक्षा कमी कालावधी राहिला आहे. भाजपसह विरोधी पक्षानेही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. 2019 मध्ये पराभूत झालेल्या लोकसभा मतदार संघात भाजपनं कंबर कसली आहे. केंद्रीय मंत्री त्या मतदारसंघात तळ ठोकून आहेत. प्रत्येक बूथ मजबूत करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. …
Read More »माऊली देवीच्या आशीर्वादाने खानापूर समितीच्या जनजागृती दौऱ्याची सुरूवात!
खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीची एकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नूतन पदाधिकारी नेमणूक करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 1 फेब्रुवारी रोजी म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात जनजागृती दौऱ्याची सुरूवात कणकुंबी येथील माऊली देवीच्या पुजनाने करण्यात आली. खानापूर तालुका …
Read More »येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचा यावर्षी पासून विशेष साहित्य पुरस्कार : साहित्यिकांना आवाहन
येळ्ळूर : येथील येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने यंदापासून विशेष साहित्यिक पुरस्कार देण्यात येणार असून या पुरस्काराचे पुरस्कर्ते उद्योगपती आप्पासाहेब गुरव हे आहेत. मराठी साहित्यामधील कथा, कादंबरी, नाटक, कविता आधी मध्ये ग्रामीण भागातील स्त्रीचे चित्रण उठावदारपणे करण्यात आलेले आहे. अशा साहित्य कृतीला यंदापासून आप्पासाहेब गुरव यांच्या आजी …
Read More »हसन मुश्रीफांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेत ईडीची छापेमारी
कोल्हापूर : माजी कामगार मंत्री आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेत ईडीने (ED) छापेमारी केली आहे. कागलमधील काही शाखांमध्येही ईडी अधिकारी पोहोचले आहेत. गेल्या महिन्यात 11 जानेवारी रोजी आमदार हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष …
Read More »श्रेयस अय्यर पहिल्या कसोटीतून बाहेर! सूर्यकुमारला पदार्पणाची संधी
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी मालिकेपूर्वी भारताला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाच्या मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्या गैरहजेरीत भारतीय संघ व्यवस्थापन शुबमन गिलला पसंती देऊन मधल्या फळीत सूर्यकुमार यादवला खेळवण्याचा विचार …
Read More »श्री समादेवी जयंती उत्सवाला प्रारंभ; चार दिवस उत्सव चालणार
बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज बेळगाव यांच्यातर्फे आयोजित श्री समादेवी जयंती उत्सवाला आज बुधवारपासून भक्तिभावाने प्रारंभ झाला असून येत्या शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2020 पर्यंत चालणाऱ्या या उत्सवांतर्गत विविध कार्यक्रम होणार आहेत. तेंव्हा वैश्यवाणी समाज बांधव व भक्त मंडळींनी बहुसंख्येने या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन …
Read More »रमेश जारकीहोळींच्या निवासस्थानासमोर शिवकुमार समर्थकांची निदर्शने
रमेश जारकीहोळीना हद्दपार करण्याची मागणी बंगळूर : प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर, त्यांच्या समर्थकांनी आज (ता. ३१) माजी मंत्री व आमदार रमेश जारकीहोळी यांच्या बंगळुर येथील निवासस्थानासमोर जोरदार निदर्शने केली. शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी रमेश जारकीहोळी यांच्या हद्दपारीची …
Read More »कळसा-भांडूरा प्रकल्पाला कायद्यानुसारच मंजुरी
मुख्यमंत्री बोम्मईंचे गोवा सरकारला प्रत्युत्तर बंगळूर : केंद्र सरकारने कायदेशीर लढाईनंतरच कळसा-भांडूरा प्रकल्पाचा अहवाल (डीपीआर) मंजूर केला, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी सांगितले. कळसा-भांडूरा प्रकल्पासाठी म्हादाई नदीचे पाणी वापरण्यावरून कायदेशीर लढाई सुरू करण्याच्या गोवा सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. गोवा सरकारच्या योजना काय आहेत हे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta