Tuesday , July 28 2026
Breaking News

Belgaum Varta

जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांच्या पथकाने केली विविध नदीपात्राची पाहणी

  बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून जिल्हाभरात चांगला पाऊस पडत आहे. कृष्णा, घटप्रभा आणि मलप्रभा नद्यांमध्ये आवक वाढली असून, सध्या पुराची भीती नाही. रविवारी (23 जुलै) रोजी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांसह नदीपात्रासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन प्रसारमाध्यमांना माहिती दिली. कृष्णा नदीत …

Read More »

टिळकवाडी येथील गजानन नगर परिसरातील घरांतून शिरले पाणी; त्याची छायाचित्रे!

बेळगाव : पावसाचा जोर आज रविवारीही कायम राहिला. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे सुटल्याने ठिकठिकाणी झाडे व घरांची पडझड होत आहे. यात जीवितहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले. टिळकवाडी परिसरातील गजानन नगर भागात घरांतून पाणी शिरले.

Read More »

प्रशासकीय यंत्रणेची तत्परता; मध्यरात्रीच्या मुसळधार पावसातही वाहतूक झाली सुरळीत

  कोल्हापूर (जिमाका): मध्यरात्री साधारण 1.30 ची वेळ.. देवगड – निपाणी- कलादगी या राज्य मार्गावर फोंडाघाटात झाड पडल्यामुळे वाहतूक कोंडी होवू लागली…. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या.. अशावेळी या मार्गावरील वाहन चालकाने नियंत्रण कक्षाच्या १०० आणि १०१ क्रमांकावर संपर्क केल्यावर लगेचच उपअभियंता एस. बी. इंगवले, शाखा अभियंता एस. के. किल्लेदार, …

Read More »

“भाजपाकडून शिंदे गटाच्या विसर्जनाची तयारी”, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचे विधान

  मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळालं आहे. वर्षभरापूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार सत्तेत सामील झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी …

Read More »

कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर; गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता बंद, कोल्हापूर-गगनबावडा मार्गही बंद

  कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने जोर पकडल्याने पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. पंचगंगा नदीचे पाणी गायकवाड वाड्यापर्यंत आल्याने गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आज दुपारी तीनपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी 38 फुट 2 इंचावर पोहोचली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी 39 आणि …

Read More »

मानसिक ताणतणाव विसरून काम करावे : श्रीधर कोकणूर

  ‘महात्मा बसवेश्वर’तर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर निपाणी (वार्ता) : इच्छाशक्ती असल्यास कोणत्याही क्षेत्रात यश हमखास मिळते. तर प्रत्येक समाजसेवक मात करत राहिल्यास जीवन सुखी बनते. समूहामध्ये काम करत असताना यश हे एकट्याचे नसते तर सर्वांचे असते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. कर्मचारी वर्गाने संस्थेच्या प्रगतीत हातभार लावणे ही त्यांची जबाबदारी आहे. …

Read More »

महाराष्ट्र राजकारणाच्या सहलीचे निपाणी तालुक्यात लोन!

  ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी सहल; लाखो रुपयांचा चुराडा निपाणी (वार्ता) : वर्षापूर्वी महाराष्ट्रातील राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या. त्यामध्ये सहलीचे राजकारण करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद पटकावले. त्याची पुनरावृत्ती म्हणून कर्नाटक सीमा भागातील निपाणी तालुक्यात ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या वेळी सहलीचे राजकारण सुरू झाले आहे. त्यातूनच अनेक ग्रामपंचायत मध्ये …

Read More »

लोंढा महामार्गावरील पुल कोसळला

  खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या सहा दिवसापासून सतत होत असलेल्या पावसाने सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. लोंढ्या जवळ नव्याने बांधण्यात आलेला पूल खचला आहे. त्यामुळे मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. लोंढ्या जवळ नव्याने बांधण्यात आलेला पूल आज रविवारी सकाळी एका बाजूने खचला असल्याचे दिसून आले …

Read More »

‘एनआयए’ची तामिळनाडूत धडक कारवाई, २१ ठिकाणी छापे

  नवी दिल्ली : राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए) आज (दि. २३) तामिळनाडूमध्ये २१ ठिकाणी छापे टाकले. तंजावर जिल्ह्यातील तिरुभुवनम येथे पट्टाली मक्कल काची (पीएमके) च्या माजी पदाधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणी ही कारवाई करण्‍यात आल्‍याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. रामलिंगम यांनी शहरातील काही कथित धर्मांतराच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मागील वर्षी कार …

Read More »

बेळगाव, खानापूर आणि कित्तूर तालुक्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी

  बेळगाव : पावसाचा जोर आज रविवारीही कायम राहिला. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे सुटल्याने ठिकठिकाणी झाडे व घरांची पडझड होत आहे. यात जीवितहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले. नद्यांसह नाल्यांच्याही पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे सोमवारी (24 जुलै) बेळगाव, खानापूर आणि कित्तूर तालुक्यातील प्राथमिक व …

Read More »