Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

साखर कारखानदार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलवावी

  स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तहसिलदारना निवेदन चंदगड : चंदगड तालुक्यात ओलम शुगर, अथर्व दौलत, इको केन हे तीन साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. दरवर्षीचा अनुभव पाहता जानेवारीच्या महिनाच्या सुरवातीला चाळीस ते पन्नास टक्के ऊस तोड झाली पाहिजे. यावर्षी चंदगड तालुक्यात अनेक गावामध्ये शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्ये उभा आहे. मग तिन्ही …

Read More »

खानापूर शहरातील कामे न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मुख्यमंत्री अमृत नगरोत्थान योजनेंतर्गत नगर विकास टप्पा चार मधील रस्ते व गटारीची कामे सुरू करण्यास विलंब लावणाऱ्या या ठेकेदारावर कारवाई करावी. तसेच ही कामे त्वरीत सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर नगरपंचातीचे नगराध्यक्ष नारायण मयेकर यांनी नगरविकास खात्याच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे नुकतीच करण्यात आली. निवेदनात …

Read More »

शिवगर्जना महानाट्य प्रवेश पासचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

  खानापूर (प्रतिनिधी) : पारिश्वाड (ता. खानापूर) येथे भाजपच्या बुथ विजयी दिन आयोजित कार्यक्रमात तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप व तालुका भाजपच्या वतीने येत्या दि. ७ ते १० जानेवारी रोजी होणाऱ्या शिवगर्जना महानाट्याच्या प्रवेश पासचे अनावरण बेळगाव जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर …

Read More »

येळ्ळूरमध्ये लाळ खुरकत लसीकरण मोहीम

  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या, पशु संगोपन व पशु वैद्यकीय सेवा विभाग मार्फत दि.05/01/2023 पासून येळ्ळूर येथे राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतरंगत लाळ खुरकत रोग नियंत्रण लसीकरण करण्यात येत आहे. लाळखुरकत हा विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजार असून गायी, म्हशीं मध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. लाळखुरकत रोगांमधील बाधीत जनावरांमध्ये ताप येणे, तोंडामध्ये …

Read More »

सहकार आणि सहकार्य या दोन्ही गोष्टींची सांगड गरजेची : युवा नेते आर. एम. चौगुले

  बेळगाव : विना सहकार नाही उध्दार या पंक्तिप्रमाणे सहकार क्षेत्रात काम करत असताना सहकार आणि सहकार्य या दोन्ही गोष्टीची सांगड असणे खूप गरजेचे आहे. फक्त कर्ज देवुन चालत नाही तर सामाजिक बांधिलकी जपणेही गरजेचे आहे यामधुन या संस्थेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन म. ए समितीचे युवा नेते आर. एम. …

Read More »

खानापूर बस डेपो अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा भाजप नेते अनंत पाटील यांच्यावर हल्ला

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बस सेवेचा बोजवारा उडाला आहे. याकडे लोकप्रतिनिधी साफ दुर्लक्ष केल्याने सकाळच्या वेळेत बससेवा अपुऱ्या असल्याने बेळगावला जाणाऱ्या विद्यार्थी वर्गाला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. यासाठी बसेस वेळेत सोडा, अशी मागणी करण्यासाठी गेलेल्या भाजपचे नेते अनंत पाटील यांच्यावर खानापूर डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावरसह बस …

Read More »

यल्लम्मा देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात ६ ठार, १६ जखमी

  बेळगाव :  बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील चुंचनूर जवळ भीषण अपघात झाला आहे. यात 6 जण ठार झाले आहेत. 4 जानेवारीच्या मध्यरात्री हा अपघात झाला असून हे सर्वजण साैंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जात होते. रामदुर्ग तालुक्यातील हुलकुंद गावातील हनुमाव्वा म्यागाडी (25), दीपा (31), सविता (17), सुप्रीता (11), मारुती (42) आणि …

Read More »

“आपणच रचिले आपले सरण”

  खानापूर : बेळगाव, बागलकोट, धारवाड गदग या जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कळसा-भांडुरा प्रकल्पाला मंजुरी देऊन एक प्रकारे खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा घाट केंद्र व कर्नाटक राज्य भाजपा सरकारने घातला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खानापूर तालुक्यातील जनतेला कोणत्या पद्धतीचा धोका निर्माण होणार आहे याचा अभ्यास न करता …

Read More »

दागिना सापडला आहे कोणाचा आहे त्यांनी घेऊन जाण्याचे आवाहन

  सुरेश देसाई, माजी नगरसेवक अनिल पाटील व उमा शंकर देसाई यांचा प्रामाणिकपणा; घेऊन जाण्यासाठी यांनी केले आवाहन बेळगाव : मिलिटरी हॉस्पिटल कॅम्प आवारात बुधवार दिनांक 04/1/2023 रोजी सकाळी एक सोन्याचा दागिना सापडलेला आहे तो मौल्यवान असून भारी किमतीचा आहे. सोन्याचा दागिना कोणाचा हरवलेला आहे ते पाहून त्या दागिन्याची ओळख …

Read More »

दुष्काळग्रस्त भागाला कळसा- भांडूरा ‘जलामृत’; केंद्र सरकारचा धाडसी निर्णय : डॉ. सोनाली सरनोबत

  भाजपचे जनतेच्या वतीने आभार खानापूर : केंद्रातील भाजप सरकारने अनेक दशकांपासून रखडलेल्या बेळगाव, बागलकोट, धारवाड, गदग या जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कळसा-भांडूरा प्रकल्पाला मंजुरी देऊन धाडसी पाऊल उचलले आहे. केंद्रीय जल आयोगाने 29 डिसेंबर रोजी कर्नाटकने सादर केलेल्या विस्तृत प्रकल्प अहवालाला मंजुरी दिली आहे. महादाई नदीचा 2.18 TMC …

Read More »