Monday , September 21 2026
Breaking News

दागिना सापडला आहे कोणाचा आहे त्यांनी घेऊन जाण्याचे आवाहन

Spread the love

 

सुरेश देसाई, माजी नगरसेवक अनिल पाटील व उमा शंकर देसाई यांचा प्रामाणिकपणा; घेऊन जाण्यासाठी यांनी केले आवाहन

बेळगाव : मिलिटरी हॉस्पिटल कॅम्प आवारात बुधवार दिनांक 04/1/2023 रोजी सकाळी एक सोन्याचा दागिना सापडलेला आहे तो मौल्यवान असून भारी किमतीचा आहे. सोन्याचा दागिना कोणाचा हरवलेला आहे ते पाहून त्या दागिन्याची ओळख पटवून देऊन कोणाचा आहे तो दागिना घेऊन जावा. दागिन्यांची ओळख पटवून देण्यासाठी त्या 1) दागिन्याचा असलेला फोटो, 2) दागिना घेतलेली रीतसर पावती, 3) कोणाच्या दागिना आहे त्याचा आधार कार्ड, 4) स्वतःचा फोटो आयडी साइज ही सगळी कागदपत्रे घेऊन येणे अतिशय महत्त्वाच्या असून सक्तीचे आहे.

भारी किमतीच्या सोन्याचा दागिना हरवलेला असून त्याची किंमत खूप मोठी होऊ शकते. वस्तू पडल्यानंतर त्यांना विरह होऊ शकतोच दुःख होऊ शकते त्यासाठी प्रामाणिकपणे त्याला वापस करणे समाजाची जबाबदारी असते पण असे दुर्मिळ प्रसंग घडतात आणि एखादाच प्रामाणिक व्यक्ती या ठिकाणी दिसून येतो त्यामध्ये निवृत्त जवान श्री. सुरेशराव देसाई (उचगाव बेळगाव), बेळगावचे समाजसेवक आणि माजी नगरसेवक श्री. अनिल पाटील (वडगाव, बेळगांव), श्री. उमाशंकर देसाई (उचगाव बेळगाव) यांना हा दागिना सापडलेला असून त्यांनी आवाहन केलेले आहे की; ज्यांचा कुणाचा दागिना असेल त्यांनी ओळख पटवून देऊन घेऊन जावे असे आवाहन केलेले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 07019956539, 08748888979.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *