Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

“भारत जोडो” पदयात्रेत खानापूर तालुक्यातून हजारो कार्यकर्ते सामील : डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर

  खानापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी होण्यासाठी आज पहाटे 4 च्या सुमारास दोन हजार कार्यकर्ते बेल्लारीकडे बसने रवाना झाले. त्याचबरोबर खाजगी वाहनाने देखील काँग्रेस कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले आहेत. मा. आमदार अंजलीताई संपूर्ण कर्नाटकात राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी आहेत. त्यात आज खानापुरातून हजारोंच्या …

Read More »

श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळच्या सुवर्णमहोत्सवच्या पार्श्वभुमीवर माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन

  बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ व श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवाच्या पार्श्वभुमीवर माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करण्यात आली. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची बैठक गुरूवार दिनांक 13/10/2002 रोजी हायस्कूलच्या सभागृहात पार पडली. अध्यक्षपदी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. ए. डी. धामणेकर हे होते. बैठकीमध्ये संस्थेचे सचिव श्री. प्रसाद मजुकर, मुख्याध्यापक श्री. ए. डी. …

Read More »

हालसिद्धनाथ यात्रेच्या मुख्य दिवशी भाविकांची गर्दी

  चोख पोलिस बंदोबस्त : विविध धार्मिक कार्यक्रम कोगनोळी : हलसिद्धनाथ महाराज की जय चांगभलं च्या जयघोषात आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील हालसिद्धनाथ यात्रेच्या मुख्य दिवशी लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंगळवार तारीख 11 रोजी कुर्ली, आप्पाचीवाडी पालखी सवाद्य मिरवणूकीने खडक मंदिरात आणण्यात आली. या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम पार …

Read More »

उद्घाटनाच्या दोनच दिवसात तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलाची दुर्दशा!

  बेळगाव : उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी तिसऱ्या रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या दुर्दशेचे फोटो सध्या समाजमाध्यमातून वायरल होत आहेत. उड्डाणपुलाच्या कामकाजाबाबत तक्रारींचा पाऊस पडत आहे. तब्बल १४ महिन्यानंतर नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला तिसऱ्या रेल्वेगेट नजीकचा उड्डाणपूल उद्घाटनच्या दुसऱ्याच दिवशी समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. अवजड वाहतूक, अपघात आणि बेळगाव शहरात वाढलेली …

Read More »

तब्बल आठ महिन्यानंतर मिळालेले खानापूर तालुका पंचायतीचे ईओ अधिकारी अद्यापही गैरहजर

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिमागासलेला व दुर्गम तालुका म्हणून सर्वाना परिचित आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात नेहमीच अनेक समस्या भेडसावत असतात. अशा समस्यानी ग्रस्त असलेल्या खानापूर तालुक्याला गेल्या आठ महिन्यापासून तालुका पंचायत कार्यनिर्वाह अधिकारी (एईओ) पद रिक्त होते. त्यामुळे तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. …

Read More »

भारत जोडो पदयात्रेत ग्रामीण भागातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी

  बेळगाव : विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो पदयात्रेत सहभागी झाले. दीडशेहून अधिक वाहनांमधून निघालेल्या कार्यकर्त्यांना चन्नराज हट्टीहोळी यांनी मार्गदर्शन केले. सर्वजण संध्याकाळी बेल्लारीतील फेरीत सामील झाले. कर्नाटकात दाखल झालेल्या दिवसापासून बेळगावच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर पदयात्रेत …

Read More »

गोपाळ देसाई गटाचे आरोप बिनबुडाचे : बाळासाहेब शेलार

  खानापूर : 1 नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळण्यात यावा यासाठी खानापूर तालुक्यात जनजागृतीचे वारे दोन्ही गटातून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर लक्ष्मी मंदिर खानापूर येथे नुकतीच बैठक पार पडली. सदर बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. एकी करणे ही काळाची गरज आहे. या हेतूने मागील आठवड्यात दोन्ही गटाच्या प्रत्येकी पाच सदस्यांची …

Read More »

’स्टार्ट अप’ शिबिरातून जिल्ह्यात अधिकाधिक नवउद्योजक घडावेत : कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के

  तरुणांनी जिद्दीने वाटचाल करुन यशस्वी उद्योजक बनावे कोल्हापूर (जिमाका) : तरुणांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा उपयोग करुन उद्योगनिर्मिती करताना अपयश आल्यास खचून न जाता जिद्दीने वाटचाल करुन यशाच्या दिशेने पुढे जावे, असे सांगून प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणार्‍या अशा ’स्टार्ट अप’ शिबिरातून जिल्ह्यात अधिकाधिक नवउद्योजक घडावेत, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. …

Read More »

जनकल्याण इमारत व इतर बांधकाम संघातर्फे सहाय्यधनाचे मंजुरी पत्र वाटप

  बेळगाव : जनकल्याण इमारत व इतर बांधकाम संघ हिंदवाडी यांच्यातर्फे बांधकाम कामगार कार्डधारकांना लग्नासाठी कर्नाटक गव्हर्मेंटतर्फे मिळणारे 50 हजार रुपयाचे सहाय्यधनाचे मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. यावेळी बसरीकट्टी, शिंदोळी, मास्तमर्डी, आलतगा व बेळगाव येथील कामगार कार्डधारकांना याचा लाभ मिळाला आहे. संघाचे अध्यक्ष, माजी आमदार श्री. संजय पाटील यांच्या हस्ते …

Read More »

हलशी ते गुंडपी रस्त्याची दयनीय अवस्था

  खानापूर : हलशी ते गुंडपी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती हलशी-गुंडपी रस्त्याची झाली आहे. संबंधित खात्याकडे वारंवार मागणी करून देखील या रस्त्याची डागडुजी करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करत आहे. छत्रपती शिवाजी हायस्कूल हलशी ते सरकारी मराठी शाळा हलशीवाडी ते गुंडपी रस्त्याची दुरावस्था …

Read More »