Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

कोल्हापूर येथील धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

  तालुका म. ए. समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा निर्धार  बेळगाव : कर्नाटक सरकारने येथील म. ए. समितीचा मेळावा होऊ दिला नाही. त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कर्नाटकने केले असून त्याविरोधात आता कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दि. 26 रोजी धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मोठ्या संख्येने म. ए. समितीच्या …

Read More »

दिग्विजय युथ क्लब मण्णूरतर्फे प्रीमियर लीग सिझन-४ उत्साहात

  बेळगाव : दिग्विजय युथ क्लब मण्णूरतर्फे मण्णूर प्रीमियम लीग सिझन – ४ चे आयोजन करण्यात आले होते. रविवार दि. १८ डिसेंबर रोजी मण्णूर येथील छत्रपती शिवाजी मैदानावर या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते आर. एम. चौगुले आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांच्याहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या …

Read More »

कै. एम. डी. चौगुले प्रतिष्ठानच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन

  बेळगाव : मण्णूर येथील कै. एम. डी. चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेसाठी अनेक विधायक कार्य करणाऱ्या संघाच्या माध्यमातून सहकार्याच्या भावनेतून नेहमीच खारीचा वाटा उचलणाऱ्या प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हातभार लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगाव परिसरातील …

Read More »

सीमावादावर पंतप्रधान मध्यस्थी करणार!

  दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेचे आश्वासन ; खा.धैर्यशील माने यांची माहिती नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेचा वाद आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दरबारी पोहोचला. खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून केल्या जाणाऱ्या बेताल वक्तव्यांमुळे सीमाभागात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, …

Read More »

महाराष्ट्राच्या विधानसभेत कर्नाटक विरोधी प्रभावी प्रस्ताव आणणार : शंभूराज देसाई

  नागपूर : कर्नाटक सरकारपेक्षाही प्रभावी प्रस्ताव आणणार आहोत, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद समन्वय समितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी विधान भवन परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना दिली. शंभूराज देसाई पुढे म्हणाले, विधानसभेच्या विद्यमान सदस्य मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे शोक प्रस्ताव आज सभागृहात मांडण्यात आला. शोक …

Read More »

“चलो कोल्हापूर” धरणे आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा

  खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्णय खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आदेशानुसार “चलो कोल्हापूर”साठी खानापूर येथील शिवस्मारकात बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सीमासत्याग्रही पुंडलिकमामा चव्हाण हे होते. व्यासपीठावर माजी आमदार दिगंबरराव पाटील, तसेच मध्यवर्ती समितीने नियुक्त केलेले अष्ठप्रतिनिधींपैकी प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे व हणमंत मेलगे उपस्थित होते. “चलो …

Read More »

कायदा-सुव्यवस्था राखणे प्रत्येकाचे कर्तव्य : एडिजीपी अलोक कुमार

  बेळगाव : सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत सीमाभागात कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखण आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडिजीपी) अलोक कुमार यांनी केले. टिळकवाडी पोलीस ठाण्यात आज शुक्रवारी झालेल्या म. ए. …

Read More »

कोगनोळी आठवडी बाजार भरवण्यावरून वाद

  कायमचा तोडगा काढण्याची मागणी : प्रीतम पाटलांची मध्यस्थी कोगनोळी : येथील शुक्रवारी आठवडी बाजार भरण्याच्या पार्श्वभूमीवर व्यापारी नागरिक यांच्या वाद झाल्याची घटना शुक्रवार तारीख 23 रोजी दुपारी 3 सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, गेली अनेक वर्षे शुक्रवारी आठवडी बाजार हा जुना बाजारपेठ येथे भरत आहे. बाजार पोलीस …

Read More »

खानापूर भाजप कार्यकरिणीची बैठक संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्या कार्यकरिणीची बैठक येथील शिवस्मारक सभागृहात नुकताच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा कार्यदर्शी संदीप देशपांडे, सुभाष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, धनश्री सरदेसाई, वासंती बडिगेर, बाबूराव देसाई, जोतिबा रेमाणी, विजय कामत, …

Read More »

सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने १६ जवानांचा मृत्यू

  सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने १६ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर, या घटनेत चार जवान जखमी झाले आहे. घटनास्थळावर स्थानिक पोलीस आणि लष्कराकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळच्या सुमारास लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन चट्टेनहून थांगूच्या दिशेने निघाले होते. …

Read More »