बेळगाव : पतंग उडवताना नजरचूकीने इमारतीच्या छतावरून पडून एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी बेळगावातील अशोकनगरमध्ये घडली. 11 वर्षीय अरमान दफेदार या सेकंड क्रॉस, तिरंगा कॉलनी, उज्वल नगर येथे राहणाऱ्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. काल, बुधवारी हा मुलगा त्याच्या कुटुंबीयांसह अशोकनगर येथील नातेवाईकाच्या घरी आला होता. …
Read More »दुर्गामाता दौडीची निपाणीत उत्साहात सांगता
निपाणी (वार्ता) : गेले अकरा दिवस चालू झालेली दुर्गामाता दौड विजयादशमी दिवशी सांगता करण्यात आली. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला सप्त नद्याचे पाणी आणून ओंकार शिंदे, प्रसाद परीट,वैभव कळसकर, प्रणय दवडते, राहुल नंदगावकर, उत्तम कामते, साहिल कांबळे, प्रकाश इंगवले, प्रथमेश पाटील, प्रवीण भोसले, आशिष भाट यांच्या हस्ते …
Read More »मोहनलाल दोशी विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत यश
निपाणी (वार्ता) : स्टुडंट ऑलिम्पिक आसोशिएशन कोल्हापूर यांच्यावतीने शिवाजी विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणीत व्हॉलीबॉल व खो-खो स्पर्धेत अर्जुननगर (ता.कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. व्हॉलीबॉल संघात आदित्य जाधव, श्रेयश तोंदले, प्रणव लोहार, श्रेयश रजपूत, शुभम हजारे, शंतनू रेपे, सुयश पाटील, सर्वेश देवनहळ्ळी, …
Read More »निपाणी शहर, परिसरात सीमोल्लंघन
सोने लुटून दसरा साजरा : दसऱ्याच्या एकमेकांना शुभेच्छा निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात बुधवारी (ता.५) दसरा सण उत्साहात साजरा अनेक ठिकाणी सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नागरिकांनी एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाडामध्ये विविध उपक्रमांनी नवरात्र उत्सव आणि दसरा सण उत्साहात पार …
Read More »थायलंडच्या बाल संगोपन केंद्रात गोळीबार; 22 मुलांसह 34 जण ठार
थायलंडच्या ईशान्येकडील प्रांतात बालसंगोपन केंद्रात माजी पोलिस कर्मचार्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 22 चिमुरड्यांसह 34 जणांचा करुण अंत झाला. पोलिसांच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. पोलिस कर्मचार्याने रक्तपात केल्यानंतर स्वत:वरही गोळी झाडल्याने त्याचाही मृत्यू झाला. पोलिस उपप्रवक्ते अर्कोन क्रेटोंग यांनी रॉयटर्सला माहिती देताना सांगितले की, या घटनेत तब्बल 32 जणांचा …
Read More »अमेरिकेत भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या हत्येने खळबळ
कॅलिफॉर्निया : भारतीय वंशाच्या कुटुंबातील चार जणांचे मृतदेह अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियातील एका फळबागेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये आठ महिन्यांच्या मुलीचा देखील समावेश आहे. हे कुटुंब काही दिवसांपासून बेपत्ता होते, अशी माहिती ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे. आठ महिन्यांच्या आरोही धेरीसह तिची आई 27 वर्षीय जसलीन कौर आणि वडील जसदीप …
Read More »सोनिया, राहुलसमवेत ‘भारत जोडो’त आम. निंबाळकर, आम. हेब्बाळकर यांचा उत्स्फूर्त सहभाग
बेळगाव : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर व बेळगाव ग्रामीण आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पक्ष नेत्या सोनिया गांधी आणि युवा नेते राहुल गांधी यांच्या समवेत उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. या पदयात्रेत खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनीही सहभाग घेतला. सीमावर्ती खानापूर मतदारसंघात पन्नास वर्षांच्या इतिहासात प्रथमच …
Read More »यरगट्टी येथे कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; एक ठार
यरगट्टी : यरगट्टी येथील मूट्टूत फायनान्सजवळ गुरुवारी सकाळी कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. या अपघातात ट्रक चालक रंगाप्पा पाटील (३०) यांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील गौडाप्पागौड अमरगौड (२५), वीरभद्रगौड एस. दबी (३२) या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. …
Read More »केरळ येथे दोन बसची समोरासमोर धडक; 9 ठार
तिरुअनंतपुरम : केरळ राज्य परिवहन बसला पर्यटक बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 38 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. केरळमधील पलक्कड येथे हा अपघात झाला. पर्यटक बस बसेलियस विद्यानिकेतन शैक्षणिक संस्थेतून विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन उटीला जात होती. यावेळी हा अपघात झाला. पोलिसांनी …
Read More »गद्दारीचा शिक्का या जन्मी पुसता येणार नाही; राज्यात पुन्हा सरकार आणून दाखवेन
शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची डरकाळी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्यासोबतच्या आमदारांसह भाजपवर पुन्हा एकदा घणाघात केला. आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात शिंदेंचे नाव न घेता उद्धव म्हणाले, ‘होय, गद्दार, गद्दारच म्हणणार. मंत्रिपदे काही काळापर्यंत राहतील, पण कपाळावरला गद्दारीचा शिक्का या जन्मी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta