Thursday , September 19 2024
Breaking News

Belgaum Varta

अतिवृष्टीमुळे चंदगड तालुक्याला पूराचा विळखा…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोल्हापूर रेड अलर्टमध्ये असणाऱ्या चंदगड तालुक्यांतील कित्येक भागांमध्ये जोरदार पावसामुळे सर्वत्र पूरसदृश्य अवस्था झाली असून काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, घरांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी घात-पात घडून येत आहेत.कोवाड, जांबरे, काणूर, पाटणे फाटा, अडकुर या भागात सर्वत्र अतिवृष्टीमुळे पूरजण्य परिस्थिती पहायला मिळाली. धरण, बंधारे, …

Read More »

विजेच्या धक्क्याने कापोलीच्या शेतकऱ्याचा मृत्यू

खानापूर (प्रतिनिधी) : कापोली के. जी.च्या ता. खानापूर येथील शेतकऱ्याचा शेतातील विजेची मोटर बाहेर काढताना विजेचा धक्का बसुन जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, अरविंद शंकर देसाई (वय ४२) हे आपल्या शेतात पुरामुळे वीज मोटरीचे नुकसान होऊनये म्हणून स्टार्टची पेटी बाजुला काढताना विजेचा धक्का बसुन जागीच …

Read More »

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोल्हापूर रेड अलर्टमध्ये असणाऱ्या चंदगड तालुक्यांतील कित्येक भागांमध्ये जोरदार पावसामुळे सर्वत्र पूरसदृश्य अवस्था झाली असून काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. माळी ते खळणेकरवाडी रस्त्यावर डोंगरातून येणारा सुकाहळ्ळा येथे अतिवृष्टीमुळे शेतातील ओढ्यामधून जोरदार पानीप्रवाह वाहल्याने तेथील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. हा ओढा कमी …

Read More »

माणगावात गोवा बनावटीच्या दारू साठ्यावर चंदगड पोलिसांचा छापा

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : गोवा बनावटीच्या दारू अड्ड्यावर चंदगड पोलिसांनी छापा टाकत त्याच्याकडून १० हजार ७२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी लक्ष्मण वैजू समेमारे (रा.माणगाव ता. चंदगड) याला अटक करण्यात आली असून ही कारवाई रविवारी (दि. २२ जुलै २०२१ रोजी) पावणेपाचच्या सुमारास केली आहे. आरोपी लक्ष्मण वैजू …

Read More »

तालुक्यात मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : गुरूवारी व शुक्रवारी खानापूर शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावुन प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे अनेकाचे संसार उघड्यावर पडले आहे.नुकसान झालेल्या तलावाला मोठे भगदाड पडल्याने मेरडा करजगी मार्गावरील तलावाचा बांध फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या मोठ्या पावसामुळे तलावात पुरेपूर पाणी साठा होत आहे त्यातच तलावाच्या …

Read More »

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अजूनही पाणी

निपाणी : मागच्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी तालुक्याच्या सौंदलगा हद्दीत वेदगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास सुमारे १२ फूट पाणी आल्याने गेल्या ३६ तासापासून आंतरराज्य वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास पाणी पातळीत ३ फुटाने घट …

Read More »

जिव्हाळा फाऊंडेशनच्यावतीने महामार्गावर ट्रक चालकांना अन्नाची पाकिटे, पाणी आणि केळ्यांचे वाटप

बेळगाव : बेळगाव परिसरात मुसळधार पावसामुळे शेकडो ट्रक आणि ट्रक चालक महामार्गावर अडकले आहेत. त्यांना जेवण आणि पिण्यासाठी पाणीसुद्धा मिळत नव्हते याची माहिती जिव्हाळा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना समजली. लागलीच अध्यक्षा डॉ. सुरेखा पोटे, डॉ. सविता कद्दु, डॉ. राजश्री अनगोळ, आरती निप्पाणीकर, शाहबाज जमादार, वृषभ अवलक्की, योगिता पाटील, श्रीनिवास गुडमट्टी यांनी रात्री …

Read More »

कोवाड बाजारपेठ बुडाली ताम्रपर्णीच्या पुरात, बचाव पथकाने १५ कुटुंबियांना स्थलांतरीत केले

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गेल्या दोन दिवसांपासून चंदगड तालुक्यात पडलेल्या सरासरी 261 मिलिमीटर पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून तालुक्यातील कोवाड बाजारपेठेला सलग तिसऱ्या वर्षी पुराच्या पाण्याचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. बचाव पथकाने१५ कुटुंबियाना आज स्थलांतरीत केले.कालच्या दिवसभरात पडलेल्या पावसामुळे संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली असून कर्यात भागातील इतर गावाचा …

Read More »

जळग्यात तलाव फुटून शेतीचे नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात थैमान घातलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी करून सोडले. खानापूरात उचांकी पाऊस झाल्याने नदी, नाले, तलाव आदी तुडूंब भरून वाहत आहेत. पाण्याचा प्रवाह इतका वाढला की जळगे (ता. खानापूर) गावचा तलाव अक्षरशः फुटून भात शिवाराचे मोठे नुकसान झाले.जळगे गावापासून जवळच सार्वजनिक तलाव आहे. शुक्रवारी सुरू …

Read More »

पांढऱ्या नदीच्या प्रवाहातून एकाला वाचविले!

खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा (ता. खानापूर) येथील गणपती मिठारे हे आपल्या शिवारातील घरात कामानिमित्त अडकले. मुसळधार पावसामुळे व पांढऱ्या नदीच्या वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे ते घराच्या छतावर राहिले. त्यांना गणेशगुडीच्या टीमने वाचविले.याबाबत मिळालेला माहिती अशी की, तालुक्यातील मुसळधार पावसाने हाहाकार उडाला असताना लोंढ्यात ता. खानापूर येथील गणपत लक्ष्मण मिठारे हे शिवारातील …

Read More »