Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

आप्पाचीवाडी येथे हायस्कूल इमारत शुभारंभ

  पालक वर्गातून समाधान : मंत्री शशिकला जोल्ले यांचे प्रयत्न कोगनोळी : आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या हायस्कूल इमारतीचा शुभारंभ मंत्री शशिकला जोल्ले व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाराम खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. …

Read More »

कर्नाटक भाजप युवा मोर्चाच्या नेत्याची हत्या

  बेंगलोर : दक्षिण कन्नडमधील सुळ्य तालुक्‍यातील बल्‍लारे येथे मंगळवारी रात्री उशिरा भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांची दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्‍यक्‍तींनी प्राणघातक शस्‍त्रांनी वार करून हत्या केली. प्रवीण नेट्टारू हे रात्री दुकान बंद करून घरी जात असताना केरळ राज्यातील नोंदणीकृत दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तलवारीने यांच्यावर हल्ला केला. हत्येची …

Read More »

गळा चिरून पोटच्या मुलाचा बापाकडून निर्घृण खून; पत्नी गंभीर जखमी

बेळगाव : गोकाक तालुक्यातील शिल्तीभावी गावच्या हद्दीतील एका ऊसाच्या शेतात बालेश अक्कनी (वय 4) या मुलाचा पित्याने गळा चिरून खून केल्याची घटना घडली. तर आई लक्ष्मी मतेप्पा अक्कनी (27) या गंभीर जखमी झाल्या. आरोपी मतेप्पा अक्कनी (28) याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

  मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून तसेच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समितीकडून आम. चंद्रकांत पाटील यांचे सांत्वन

बेळगाव : महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी -सदस्यांनी मंगळवारी दुपारी कोल्हापूर मुक्कामी त्यांची भेट घेऊन सांत्वन केले. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील (वय 91) यांचे काल रविवारी सायंकाळी वृद्धापकाळाने संभाजीनगर, कोल्हापूर येथील निवासस्थानी निधन …

Read More »

आणखी एका संशयित दहशतवाद्याला तमिळनाडूत अटक

सीसीबी पोलिसांची कारवाई, दहशतवादी अख्तरच्या चौकशीतून माहिती समोर बंगळूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहाद युद्ध भडकविण्यासाठी प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली सीसीबी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दहशतवाद्याने दिलेल्या माहितीवरून तामिळनाडूमध्ये आणखी एका संशयिताला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याला अधिक चौकशीसाठी बंगळूरात आणण्यात येत आहे. सीसीबी पोलिसांनी रविवारी रात्री बंगळुरमधील टिळक …

Read More »

बेळगावात मटका अड्ड्यावर छापा; तीन आरोपींना अटक

  बेळगाव : बेळगावातील हंस टॉकीज रोडवरील मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तीन आरोपींना अटक केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलिस निरीक्षक निंगनगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेळगाव शहरातील मटका अड्ड्यावर छापा टाकून जुगार खेळणाऱ्या तिघांना अटक केली. अभिषेक प्रकाश शिवापुर रा. पांगुळा गल्ली, शुभम लक्ष्मण तुपारी रा. खडक गल्ली …

Read More »

अवैधरित्या साठवलेला 7 लाख रुपये किंमतीचा रेशन तांदूळ जप्त

बेळगाव : अवैधरित्या साठवलेला सुमारे सात लाख रुपये किमतीचा 320 क्विंटल रेशन तांदूळ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पकडण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी अवैधरित्या साठवण्यात आलेला 320 क्विंटल रेशन तांदूळ जप्त केला आहे. सुमारे 7 लाखाहून अधिक किमतीचा हा तांदूळ असून याप्रकरणी …

Read More »

सदलग्यातील दूधगंगेवरील जुना पूल ढासळला; किसान पूलही बनत आहे कमकुवत

  सदलगा : सदलगा येथील दूधगंगा नदीवरील जुना पूल दूधगंगेच्या प्रवाहामुळे ढासळला. या पुलाच्या पूर्व-दक्षिण रस्त्याला जोडणाऱ्या बांधकामाच्या दक्षिणेकडील बाजूस भिंतीवरील कोरलेल्या पण पुसट झालेल्या नोंदीनुसार तत्कालीन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री एस्. निजलिंगाप्पा यांच्या हस्ते १९५९ सारी या पुलाचे उद्घाटन झाले होते. हा पूल म्हणजे बंधारा वजा पूल पण सदलगा, एक्संबा, …

Read More »

उद्या खानापूर शहरातील महिलांचा रोजगारासाठी मोर्चा

  बेळगाव : ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना ज्या प्रकारे ग्राम पंचायतीकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार देण्यात येतो. त्याप्रमाणे शहरातील गरीब महिला आणि पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी उद्या बुधवार दिनांक 27 रोजी खानापूर शहरातील मोलमजुरी करणाऱ्या महिलांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची सुरुवात खानापूर शहरातील …

Read More »