Thursday , September 19 2024
Breaking News

Belgaum Varta

सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला मतिमंद मुलाला आधार!

बेळगाव : जुना पी. बी. रोड येथे गेल्या काही दिवसापासून एक मतिमंद मुलगा नाल्याच्या पाईपमध्ये रहात होता ही माहिती हेल्प फॉर नीडी ऑटो अम्ब्युलन्सचे अध्यक्ष गौतम कांबळे आणि जिव्हाळा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. माधुरी जाधव पाटील यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्या मुलाला आधार मिळवून देण्याकरिता त्याची विचारपूस करण्यासाठी …

Read More »

ताराराणी हायस्कूलचे शिक्षक एस. एन. पाटील यांचे निधन

खानापूर (प्रतिनिधी) : निडगल (ता. खानापूर) गावचे सुपुत्र व ताराराणी हायस्कूलचे सहशिक्षक एस. एन. पाटील (वय ५१) यांचे रविवारी दि. २० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

Read More »

एससी /एसटी तसेच ओबीसी प्रवर्गातील कोविड मृतांच्या वारसांना मिळणार आर्थिक मदत

बेळगाव : कोविड -१९ मुळे मृत्यू झालेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाईल, असे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा दंडाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले. कोविड -१९ संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेत बेळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाने मृत झालेल्या अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या कुटुंबियांना, एम एफ एस …

Read More »

मार्कंडेय नदीत वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला

बेळगाव : तीन दिवसांपूर्वी काकती पुलाजवळ मार्कंडेय नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला आहे. काकतीच्या पुलापासून ३ कि.मी. वर असलेल्या दर्गा पुलाजवळ हा मृतदेह सापडला. एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि वाल्मिकी युवा संघटनेच्या कार्यकर्त्यानी सलग तीन दिवस शोधमोहीम राबवली होती अखेर आज या शेतकऱ्याचा मृतदेह हाती लागला. यावेळी कुटुंबीयांचा शोक …

Read More »

खानापूरात पाऊस ओसरला, नदी पात्रातील पाणी घसरले

खानापूर (प्रतिनिधी) : अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखणाऱ्या खानापूर तालुक्यात गेल्या पाच दिवसापासुन खानापूर शहरासह तालुक्यात पावसाने थैमान घातल्याने तालुक्यातील नदी, नाले, तलाव दुथडी भरून वाहत होते.रविवारी सकाळपासुन खानापूरसह तालुक्यात ऊन पाऊस असा लपंडाव खेळ सुरू होता. त्यामु़ळे रविवारी दुपारपर्यंत पावसाची उघडीप होती. काही वेळ ऊन पडले होते.खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी …

Read More »

अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्त्यांना किटचे वाटप

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील खानापूर नगरपंचायतीच्या समुदाय भवनात खानापूर शहरासह तालुक्यातील अंगणवाडी शिक्षिका तसेच आशा कार्यकर्त्यांना आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते आरोग्य किटसचे वितरण शुक्रवारी दि. १८ रोजी करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ.अंजली निंबाळकर होत्या. तर कार्यक्रमाला तालूका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रें, बाल कल्याण खात्याचे अधिकारी व इतर …

Read More »

पित्यासह दोन मुलींची गळफास घेऊन आत्महत्या

चिक्कोडी : पत्नीच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसल्याने पती आणि दोन तरुण मुलींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना चिकोडी तालुक्यातील पोगत्यानट्टीमध्ये घडली आहे. या संबंधी मिळालेली माहिती अशी कि, बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील पोगत्यानट्टी गावातील चन्नव्वा रंगापुरे (वय ४०) या महिलेचे गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.  हा धक्का …

Read More »

बेळगावच्या बिम्स आवारात अवघ्या 25 दिवसात ऑक्सिजन प्लांटची उभारणी

बेळगाव : बेळगावच्या बिम्स आवारात एल अँड टी कंपनीने केवळ 21 दिवसात ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली आहे. काल शनिवारी खासदार मंगल अंगडी यांच्या हस्ते या प्लांटचे उद्घाटन झाले.या प्लॉटमधून दर मिनिटाला 700 लिटर ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. या प्लांटमधील ऑक्सिजनचा पुरवठा बिम्सला केला जाणार आहे.कंपनीकडून सदर प्लांट बिम्सकडे रीतसर हस्तांतर …

Read More »

बेकवाड ग्राम पंचायतने घेतली ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल

खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड ग्राम पंचायतने वरील तक्रारीची दखल घेऊन ग्राम पंचायतमध्ये ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लपा गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पंच कमिटी पंचायत मेंबर व ग्रामस्थांची मिटिंग घेण्यात आलीया मिटिंगमध्ये आता पावसात साचलेले पाणी पाहून त्वरित उपाय योजना तयार करून पाणी काढण्याचे आदेश खानापूर तालुका पंचायत अधिकारी प्रकाश हल्लान्नावर यांनी पंचायत …

Read More »

बेळगाव अनलॉक

बेळगाव : महिन्यापासून बंद असलेल्या बेळगावचा प्रवास आता ‘अनलॉक’च्या दिशेने सुरु होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील नागरिक आणि व्यापारी वर्गासाठी अत्यंत आनंदाची तसेच महत्वाची बातमी आहे. कोविड रुग्णांच्या कमी होणाऱ्या संख्येमुळे अखेर कोविड निर्बंध आणखी शिथिल झाले असून 21 जूनपासून 5 जुलैपर्यंत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हीटी …

Read More »