बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २५ ऑक्टोबर २०२१ रोजी मराठीतून परिपत्रके व कागदपत्रे द्यावीत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता. हा मोर्चा विनापरवाना आणि कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप करत मोर्चा रोखुन धरण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला पण उपस्थित कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले होते. त्यानंतर प्रशासनाने नरमाईची भूमिका …
Read More »एम्स संस्थेचे बेळगावात केंद्र स्थापनेसाठी निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ही संस्था नवी दिल्ली येथे आहे. जगभरात नावाजले गेलेले भारतामधील एक नामवंत वैद्यकीय शिक्षण केंद्र अशी या संस्थेची ओळख आहे. या ठिकाणी अनेक प्रकारच्या रूग्णांवर उपचार होत असतात. या संस्थेचे केंद्र बेळगावात स्थापन व्हावे, अशी मागणी सरकारकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या …
Read More »शहरातील 12 ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांची झाडाझडती
बेळगाव : शहर उपनगर परिसरात रहदारी पोलीसांची कारवाई नेहमीच पाहायला मिळत असते. मात्र आज गुरुवारी सायंकाळी बेळगाव शहर आणि उपनगरातील एकूण बारा ठिकाणी रहदारी पोलिसांनी अचानकपणे वाहनधारकांची झाडाझडती सुरू केली. त्यामुळे वाहनधारकांची एकच तारांबळ पाहायला मिळाली. शहर उपनगरातील विविध महत्त्वाच्या चौक आणि रस्त्यांवर रहदारी पोलिसांनी आज अधिकाऱ्यांसह ठिय्या मांडलेला दिसून …
Read More »भारतीय ॲथलीट मुरली श्रीशंकरची ग्रीसमधील जागतिक स्पर्धेत ‘सुवर्ण उडी’!
नवी दिल्ली : भारतीय खेळाडू आता हळूहळू जगभरात आपली ताकद दाखवत आहेत. एकीकडे नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला. त्याचबरोबर एका भारतीय ॲथलीटने लांब उडीत देशाचे नाव रोषण केले आहे. मुरली श्रीशंकरने ग्रीसमध्ये ८.३१ मीटर लांब उडी मारून सुवर्णपदकाला गवसणी घालत इतिहास रचला. मुरली श्रीशंकरने ग्रीसमधील 12व्या …
Read More »जायंट्सचा स्तुत्य उपक्रम; दोन गरीब विद्यार्थ्यांना दत्तक
बेळगाव : कोरोनामध्ये पितृछत्र हरवलेल्या अंकिता व अनिकेत या दोन विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून जायंट्स ग्रुप बेळगाव (मेन) च्या वतीने त्या दोन मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले. त्यांचे वडील दीपक देशपांडे यांचे 2021 मध्ये तामिळनाडू येथे कोरोनाने निधन झाले. ही दोन्ही मुले आता येथे आई समवेत राहतात. …
Read More »खानापूर-जांबोटी क्राॅसवरील रस्ता सीडीच्या कामाला सुरूवात
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जत -जांबोटी महामार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण तसेच सीडी आदी कामासाठी २५ कोटीचे अनुदान मंजुर करून सार्वजनिक बांधकाम खात्याने काम पूर्णत्वाकडे नेले आहे. मात्र खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील रस्त्याच्या सीडीचे काम अद्याप झाले नव्हते. त्यामुळे अवकाळी पावसामुळे येथे पाणी साचुन वाहनधारकांची तसेच प्रवाशांची गैरसोय होत …
Read More »आंबा महोत्सवास उत्साहात प्रारंभ
बेळगाव : शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत आंब्याची विक्री करता यावी याकरिता बेळगावचे बागायत खाते आणि कोल्हापूर येथील पणन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबा महोत्सवाला आजपासून बेळगावात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. क्लब रोड येथील ह्यूम पार्क येथे या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन …
Read More »जम्मू-काश्मीर : २४ तासांत ६ दहशतवाद्यांचा खात्मा
कुपवाडा (जम्मू-काश्मीर) : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरूच आहेत. याच दरम्यान गुरूवारी (दि. २६) रोजी सकाळी कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आले. यामुळे गेल्या २४ तासात सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश मिळाले आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि मोठा दारूगोळ्या, इतर …
Read More »मालवाहू वाहनाचा ब्रेक फेल होऊन अपघात; सुदैवाने प्रवासी बचावले!
बेळगाव : बेळगावमधील चन्नम्मा सर्कलमध्ये गुरुवारी सकाळी थरारक अपघात झाला, ज्यामुळे सर्वांच्याच काळजात धस्स झाले. ब्रेक फेल झाल्याने मालवाहू वाहनाने बसला धडक दिली परंतु सुदैवानेच प्रवासी बचावले. बेळगावातील चन्नम्मा चौकात गुरुवारी सकाळी काळजात धडकी भरविणारा विचित्र अपघात झाला. एका मालवाहू वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने समोरील वाहनाला धडक दिली. त्यानंतर समोरील …
Read More »हृदयद्रावक! सेनेगल हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 11 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू
आफ्रिकेच्या सेनेगलमधील हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 11 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडलीय. या दुर्दैवी घटनेनंतर सेनेगलचे अध्यक्ष मॅकी सॅल यांनी बुधवारी रात्री उशिरा सांगितलं की, ‘पश्चिम सेनेगल शहरातील तिवौनेमधील रुग्णालयात आगीमुळं 11 नवजात बालकांचा मृत्यू झालाय.’ यादरम्यान, पश्चिम आफ्रिकन देशातील आरोग्य व्यवस्थेबाबत सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सेनेगलमध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta