निपाणी (वार्ता) : कारदगा ग्रामपंचायत नूतन अध्यक्ष पदी राजू खिचडे तर उपाध्यक्षपदी मंगल डांगे यांची निवड झाली आहे. काल मित्र बोरगाव येथे सहकाररत्न रावसाहेब पाटील यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. तर युवा नेते उत्तम पाटील यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. या नंतर युवा नेते उत्तम पाटील यांनी कारदगा ग्रामपंचायतीचे नूतन अधक्ष …
Read More »कोगनोळी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
कोगनोळी : येथील श्री वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल कोगनोळीचा सन 2001-2 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक आर. के. नवाळे हे होते. सुरुवातीला माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित शिक्षकांचे पाय पूजन केले. रामकृष्ण कांबळे यांनी स्वागत तर मीनाक्षी भाकरे यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित …
Read More »जैन समाजाला सवलतींसाठी प्रयत्न
आ. श्रीमंत पाटील : उगार खुर्दला पंचकल्याण महोत्सवात सहभाग अथणी : अल्पसंख्याकांच्या यादीत येणारा जैन समाज आपल्या राज्यात मोठा आहे. मंत्रीपदी असताना या समाजाला विविध शासकीय सवलती व सुविधा मिळाव्यात, यासाठी भरपूर प्रयत्न केले. यापुढेही त्यांना सवलती मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील, असे मनोगत माजी मंत्री व कागवाडचे आ. …
Read More »उघड्या गटारीजवळ फुगे लावून स्मार्टसिटी-मनपा अधिकाऱ्यांचा अनोखा निषेध!
बेळगाव : वारंवार कळवून, संपर्क करूनही उघड्या गटारीची समस्या न सोडवणाऱ्या स्मार्टसिटी आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांचा गटारीजवळ फुगे लावून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. ही घटना बेळगावातील टिळकवाडीतील आरपीडी क्रॉसजवळ घडली. स्मार्टसिटी आणि मनपा अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलून नागरिकांना त्रासात टाकल्याचा आगळ्या पद्धतीने आज टिळकवाडीत निषेध करण्यात आला. आरपीडी क्रॉसवरील …
Read More »आज लखनऊ-बंगळुरु आमनेसामने
कोणाचे आव्हान संपुष्टात येणार? मुंबई : काल झालेल्या राजस्थान आणि गुजरात टायटन्स यांच्या लढतीत गुजरातने विजय मिळवून थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यानंतर आजच्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यामधील विजयी संघाला क्वॉलिफायर-2 सामन्यात राजस्थानशी दोन हात करावे लागतील. तर पराभूत …
Read More »गोव्यातील पंचायत निवडणुका पावसाळ्यानंतरच, प्रशासक नेमणार!
पणजी : राज्यातील पंचायतींच्या निवडणुका पावसाळ्यानंतर अर्थात तीन महिन्यानंतर घेतल्या जातील. कारण पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नाही आणि दुसरे कारण म्हणजे ओबीसी प्रभाग आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश. गोवा सरकारने राज्य निवडणूक आयोगाला ओबीसी आरक्षणाबाबत ट्रिपल टेस्ट प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे. तसा प्रस्ताव गोवा सरकारने राज्य निवडणूक आयोगाला दिलेला …
Read More »ओबीसींची जनगणना करा, सत्य समोर येऊ द्या; शरद पवारांचे केंद्र सरकारला आव्हान
मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली. ओबीसींची जनगणना करण्यात यावी. एकदा देशाला कळू द्या की, ओबीसींची संख्या किती आहे, असे आव्हानही पवार यांनी दिले. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी मेळावा …
Read More »काँग्रेसच्या प्रकाश हुक्केरी, सुनील संक यांचे उमेदवारी अर्ज दाखल
बेळगाव : येत्या 13 जून रोजी होणार्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिक्षक मतदारसंघातून माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी तर पदवीधर मतदारसंघातून सुनील संक यांनी अर्ज दाखल केले. वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. …
Read More »देसूर येथील जमिनी परत देण्याची शेतकर्यांची मागणी
बेळगाव : बेळगावमध्ये अनेक विकासकामांसाठी शेतजमिनी संपादित करण्यात आल्याने शेतकर्यांमधून संताप व्यक्त होत आहे. हलगा-मच्छे बायपास, धारवाड-कित्तूर-बेळगाव रेल्वे मार्ग, आणि आता आयटी पार्क यासाठी शेतकर्यांच्या पिकाऊ जमिनी बेकायदेशीररित्या संपादित केल्या आहेत. या जमिनी अद्यापही वापराविना पडून असल्याने सदर जमिनी परत देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. बेळगाव शहरातील श्रीनगर येथे असलेली …
Read More »आ. अनिल बेनके यांच्या कार्यालयासमोर विद्युत्त कंत्राटदारांची धरणे
बेळगाव : बेळगाव हेस्कॉम कार्यालयातील दोन भ्रष्ट अधिकार्यांची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी कर्नाटक राज्य मान्यताप्राप्त वीज कंत्राटदार संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज आ. अनिल बेनके यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कंत्राटदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर आ. अनिल बेनके म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. 2 अधिकार्यांवर भ्रष्टाचाराचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta