मुंबई : पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचनालयाच्या (ईडी) अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयाने झटका दिला आहे. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. २ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दसऱ्या पाठोपाठ संजय राऊत …
Read More »राज्य विद्याभारती ॲथलेटिक स्पर्धेत संत मीरा शाळेच्या खेळाडूंचे यश
बेळगांव : बळ्ळारी येथील बालभारती केंद्रीय विद्यालय शाळेच्या मैदानावर बळ्ळारी विद्याभारती जिल्हा संघटना आयोजित राज्यस्तरीय विद्याभारती ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या क्रीडापटूंनी 2 सुवर्ण 2 रौप्य 5 कास्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्राथमिक गटात मुलांच्यात अब्दुल्ला मुल्ला यांने 80 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक, श्रद्धा …
Read More »भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त
अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला असून हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय सैन्यातील ध्रुव हेलिकॉप्टर कोसळलं असून बचाव कार्यासाठी पथक रवाना झालं असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अद्याप या अपघातात जखमींबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात तूतिंग भागात ही दुर्घटना घडली आहे. …
Read More »मंडोळी गावातील मंदिराच्या विकासासाठी 2 कोटी : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर
गावकऱ्यांकडून उत्साहपूर्ण वातावरणात आनंदोत्सव साजरा बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मंडोळी गावात श्री मारुती, श्री विठ्ठल रुक्माई आणि श्री कलमेश्वर मंदिराच्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी कर्नाटक सरकारकडून 2 कोटी रुपये आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंजूर करून घेतले आणि 50 लाख मंदिर विश्वस्त समितीच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले. यामुळे गावात …
Read More »चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाची वंचितासोबत दिवाळी साजरी
गुरुजींनी जपली सामाजिक बांधिलकी चंदगड : दिवाळी म्हणजे अंधार दूर करणाऱ्या दिव्यांचा सण. दिवाळी म्हणजे आनंद वाटण्याचा सण. असाच आनंद चंदगड मराठी अध्यापक संघाच्या वतीने पाटणे फाटा येथील भंगार गोळा करणाऱ्या समाजासोबत वाटला आहे. गरीबीच्या पसाऱ्यात त्यांचा जन्म झाला आणि यातच त्यांच्या आयुष्याच्या वाटा निसरट्या झाल्या. आपल्यासाठी कोणीतरी गोड …
Read More »परतीचा पाऊस तंबाखूच्या मुळावर!
पाण्यामुळे तंबाखू कोमेजला : शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी निपाणी (वार्ता) : गेल्या चार दिवसापासून निपाणी शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. आठ महिन्याचे ऊस पिक संपूर्णपणे शेतात आडवा झाला आहे. तर तंबाखू पिकाला पाणी लागून तंबाखू …
Read More »आंतरराज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराने आरेकर सन्मानित
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे कर्नाटकक महाराष्ट्र, गोवा या तिन्ही राज्यांच्या वतीने अंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा, बेळगाव येथे पार पडला. आश्रय नगर येथील मराठी मुलांच्या शाळेच्या शिक्षिका ताई दिनकर आरेकर त्यांना आंतरराज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी …
Read More »नंदगड ग्रा. पं. भ्रष्टाचार चौकशीच्या आंदोलनाला माजी ग्रा. पं. सदस्य गुंडू हलशीकराचा पाठींबा
खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील ग्रामपंचायतीमध्ये 65 लाख रुपयाचा अपहार झालेल्या आरोपाची जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्याने चौकशी करावी यासाठी नंदगड ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष मन्सूर तहसीलदारसह 21 सदस्यानी नंदगड ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली. गेल्या दोन महिन्यापासून नंदगड ग्रामपंचायतमध्ये 65 लाखाचा भ्रष्टाचार झाला आहे याची चौकशी व्हावी यासाठी ग्रामपंचायत …
Read More »बेळगावात अफीमची तस्करी करणाऱ्या दोन राजस्थानी युवकांना अटक
बेळगाव : बेळगावात अफीमची तस्करी करणाऱ्या दोन राजस्थानी युवकांना अटक करण्यात सीसीबी पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या जवळील जवळपास दोन लाख 70 हजाराचे अफीम आणि इतर सामुग्री जप्त केली आहे. रोहिताश बिष्णोई वय 24 मूळचा जोधपूर राजस्थान सध्या राहणार एम. के. हुबळी आणि राजकुमार बिष्णोई मूळचा जोधपूर राजस्थान सध्या …
Read More »एससी, एसटी आरक्षण वाढीसाठी अध्यादेश जारी करणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
बंगळूर : कर्नाटक मंत्रिमंडळाने गुरुवारी राज्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (एससी/एसटी) आरक्षणात वाढ करण्यासाठी अध्यादेश जारी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या ८ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाने एससी/एसटी आरक्षण कोटा वाढवण्यास औपचारिक मान्यता दिली होती. अध्यादेशाला राज्यपालांनी संमती दिल्यानंतर अनुसूचित जातींसाठी १५ वरून १७ टक्के आणि अनुसूचित जमातीसाठी ३ वरून ७ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta