Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

अंबिका तलावाचे रक्षक बनले उत्तम पाटील गटाचे कार्यकर्ते

कोगनोळी : येथील गांवाच्या मध्यभागी असलेल्या अंबिका तलावाची मोठी दुरवस्था निर्माण झाली होती. या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले होते. अंबिका देवी, राम मंदिर, हनुमान मंदिर, कालिका देवस्थान येणार्‍या भावी का सह तलावा लागत असणार्‍या ग्रामस्थ व व्यापार्‍यांना या तलावाच्या दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. संबंधित तलावाची दुरावस्था …

Read More »

कोगनोळी दहावी केंद्र परिक्षेसाठी 243 विद्यार्थी

कोगनोळी केंद्रात परिक्षा सुरु : नियमाचे पालन कोगनोळी : येथील वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूलमध्ये दहावी परिक्षा सुरळीत सुरु झाली. सकाळी 9 वाजता विद्यार्थ्यांना तपासून व सॅनिटायझरने हात स्वच्छ करुन सोडले. या परिक्षा केंद्रावर कोगनोळी, सुळगांव, मत्तिवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी येथील 243 विद्यार्थी यामध्ये 114 मुले तर 129 …

Read More »

तिसर्‍या बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीपाल सबनीस यांची निवड

बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मे 2022 रोजी मराठा मंदिर बेळगाव या ठिकाणी होणार्‍या तिसर्‍या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला मिळणार्‍या प्रतिसादातून ‘समाजाला सत्य पहायला आवडते’ हेच दिसून आले! : भाषा सुंबली, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातील अभिनेत्री

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाने भारतात मोठी क्रांती निर्माण केली आहे. 32 वर्षे जे सत्य जनतेपासून लपवण्यात आले होते ते लोकांसमोर आल्याने मोठी जागृती झाली आहे. या चित्रपटानंतर प्रदर्शित झालेल्या अनेक मोठ्या चित्रपटांकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. यातून लोक काय पाहू इच्छितात, लोकांना काय आवडते, हे लोकांनी स्पष्ट केले आहे. ‘सब …

Read More »

महाराष्ट्रासह 9 राज्यांत सीबीआयला ’नो एंट्री’

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरातील 9 राज्यांनी सीबीआयला तपासासाठी दिलेली सामान्य सहमती आता मागे घेतली आहे. सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या शपथपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अशी परवानगी नसल्यामुळे यापैकी पाच राज्यात एकवीस हजार कोटींच्या बँक घोटाळ्यांचा तपास प्रलंबित असल्याची माहिती केंद्रीय कार्मिक …

Read More »

खेलो इंडियासाठी ज्यु. रोहिणी पाटीलची निवड

खानापूर : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजीची गावची कन्या रोहिणी पाटील आगामी काळात होणाऱ्या बेंगलोर येथे खेलो इंडिया साठी ज्युडो या स्पर्धेत भाग घेणार आहे. नुकत्याच उत्तर प्रदेश कानपूर येथे झालेल्या आंतर महाविद्यालय स्पर्धेत बेळगावच्या रोहिणी पाटील हिने उत्तम रीतीने प्रतिस्पर्ध्याची मात करत चार सामन्यात उत्तम कामगिरी करत आपले वर्चस्व टिकवून ठेवले …

Read More »

उमेश बिराजदारने केले उमेश चव्हाणला घिस्सा डावावर चितपट!

बेळगाव : कर्नाटक केसरी उमेश बिराजदार याने महाराष्ट्र चॅम्पियन उमेश चव्हाण याला पाचव्या मिनिटाला घिस्सा डावावर चितपट करत कंग्राळीचे कुस्ती मैदान मारले. रविवारी बेळगावात तालुक्यातील कंग्राळी येथे कंग्राळी येथे झालेल्या कुस्तीगीर संघटना व ग्रामस्थ यांच्या वतीनं निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या क्रमांकाची कुस्ती कृष्णा पाटील, वस्ताद काशिनाथ …

Read More »

जिनगौडा कॉलेजमध्ये निरोप समारंभ संपन्न

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील देवेंद्रनगर येथील देवेंद्र जिनगौडा पदवीपूर्व कॉलेजमधील विद्यार्थिनींचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक शहर पाणीपुरवठा महामंडळाच्या संचालिका दीपा कुडची उपस्थित होत्या. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर दीपा कुडची यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात दीपा कुडची …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव

बेळगाव : 174 वर्षाची गौरवशाली परंपरा असलेल्या गणपत गल्ली बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक नेताजी जाधव यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या मावळत्या अध्यक्षा सौ. सुनीता मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. प्रसन्न हेरेकर यांची उपाध्यक्ष पदी तर मानद कार्यवाह पदी रघुनाथ बांडगी, …

Read More »

शास्त्रीय सहागायनाच्या कल्पकतेने उलगडला आगळा संगीत अविष्कार

बेळगाव (प्रतिनिधी) : आर्ट्स सर्कलने रविवारी शास्त्रीय सह गायनाचा आगळा कार्यक्रम सादर केला. या शास्त्रीय सहगायनाच्या कार्यक्रमाच्या कलाकार होत्या ऋतुजा लाड आणि दीपिका भिडे-भागवत. अध्यक्षा लता कित्तूर ह्यांनी सर्व कलाकारांचे पुष्पगुच्छ आणि स्मरणिका देऊन स्वागत केले. कलाकारांचा थोडक्यात परिचय रोहिणी गणपुले ह्यांनी करून दिला. कार्यक्रमाची सुरुवात झाली सायंकालीन राग मुलतानीने. …

Read More »