बदलत्या वातावरणाचा परिणाम : उत्पन्न जादा दिसत असले तरी व्यवसाय खर्चिक निपाणी (वार्ता) : शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकरी वर्ग कुक्कुटपालन व्यवसायाकडे वेळलेला दिसत आहेत. निसर्गावर अवलंबून असलेली शेती व त्यातून मिळणार्या तोकड्या उत्पन्नावर उपजीविका करणे अवघड जात असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून निपाणीसह परिसरात आता शेतीपूरक जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय …
Read More »मराठी अस्मितेसाठी संघर्ष करावा लागेल
प्रा. डॉ. अच्युत माने : निपाणीत हुतात्मा दिन गांभीर्याने निपाणी (वार्ता) : लोकशाही वृत्तीने चळवळ रुजली तरच आपल्या मागण्या मान्य होणार आहेत. अलीकडच्या काळात सौदेबाजी वाढले असून गुंडाचे राज्य सुरू झाले आहे. त्यामुळे भांडवलशाहीला उत्तेजन मिळत आहे. राजकारण आणि लोकशाही या दोन्ही बाजू वेगळ्या आहेत. तरुणाईला लोकशाहीच्या लढ्यात झोकून देऊन …
Read More »मराठी अस्मितेची ज्योत विझणार नाही!
म. ए. समिती-शिवसेनेतर्फे बेळगावात हुतात्म्यांना अभिवादन बेळगाव (वार्ता) : वादग्रस्त सीमाभागाचा महाराष्ट्रात समावेश करण्याच्या मागणीसाठी 17 जानेवारी 1956 रोजी झालेल्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना आज बेळगावात अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. मराठी अस्मितेची ज्योत विझणार नाही असा ठाम निर्धारच या निमित्ताने करण्यात आला. रामदेव गल्लीतील हुतात्मा स्मारकात सोमवारी सकाळी …
Read More »राज्यात 200 स्टार्टअपना प्रत्येकी 50 लाख मूल निधी
मंत्री अश्वत्थ नारायण : देशात पहिलाच उपक्रम, ’स्टार्टअप दिना’चे आयोजन बंगळूर (वार्ता) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, अतिरिक्त 75 नवोद्यमींसह राज्यात एकूण 200 नवोद्यमीना यावर्षी जास्तीत जास्त 50 लाख रुपये मूल निधी (सीड फंड) देण्यात येईल, असे आयटी, बीटी आणि कौशल्य विकास मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण …
Read More »शिवाजी पार्कमध्ये अश्वारुढ शिवाजी महाराज पुतळा उभारणार
युवा नेते उत्तम पाटील : बोरगावमध्ये जिजाऊ जयंती निपाणी (वार्ता) : बोरगाव शहराच्या सौंदर्यात भर पडताना नियोजित छत्रपती शिवाजी पार्क याचे सुशोभीकरण करण्यासाठी नगरपंचायतकडून अनुदान मंजूर झाले आहे. सध्या याचे काम प्रारंभ झाले असून लवकरच या ठिकाणी आपणासह अरिहंत उद्योग समूह व नगरपंचायतीच्या विशेष अनुदानातून अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा …
Read More »गळतगा-भिमापूरवाडी रस्त्याचा निधी गेला कुठे
राजेंद्र वड्डर : उद्घाटन होऊनही कामाला प्रारंभ नाही निपाणी (वार्ता) : गळतगा- भिमापूरवाडी या एक किलो मीटर आंतरराज्य मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यासाठी नऊ महिन्यांपूर्वी मंत्री शशिकला जोल्ले यांनी कार्यकर्त्यासोबत वाजत गाजत रस्ता कामाचे उद्घाटन केले. पण प्रत्यक्षात कामाला प्रारंभ करण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्त्याचा निधी गेला कुठे? …
Read More »वॉर्ड क्रमांक 50 मधील नगरसेविकेची नागरिकांवरच अरेरावी
बेळगाव (वार्ता) : सध्या बेळगाव शहरात पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्या अनुषंगाने समाजसेविका माधुरी जाधव यांनी स्थानिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून वडगाव भागातील नागरिकांच्या समस्या शासनाकडे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वॉर्ड क्रमांक 50 मधील आनंदनगर दुसरा क्रॉस येथील समिती कार्यकर्त्या शिवानी पाटील तसेच परिसरातील महिलांशी संपर्क साधून पाण्याच्या समस्येबाबत चर्चा करत …
Read More »रुबेलाचे इंजेक्शन दिल्यामुळे 3 बाळांचा मृत्यू
बेळगाव : रुबेलाचे इंजेक्शन दिल्यानंतर तिघा बाळांचा मृत्यू झाल्याची घटना बेळगावात घडली आहे. रामदुर्ग तालुक्यातील बोचबाळ गावातील पवित्र हुलगुर (13 महिने), मधु उमेश कुरगुंडी (14 महिने) आणि चेतन पुजारी (15 महिने) यांचा मृत्यू झालायं. तीन दिवसांपूर्वी चौघा बाळांना बिम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पण आता तिघांचा मृत्यू झाला आहे. बालकांमध्ये …
Read More »इयत्ता 1 ते 9 वीच्या शाळा उद्यापासून पुन्हा सुरू
बेळगाव (वार्ता) : 11 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत इयत्ता 1 ते 9 वीच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले होते. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आढावा घेऊन या आदेशात बदल करण्यात आला आणि इयत्ता 1 ते 9 वी साठी सोमवार 17 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. अथणी …
Read More »संकेश्वरात भरदिवसा विधवेची गोळ्या झाडून हत्या
पैशाच्या देण्या-घेण्याच्या व्यवहारातून हत्या झाल्याचा संशय संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज सकाळी 6 वाजता अज्ञात हल्लेखोरांनी सधन विधवा महिलेची गोळ्या झाडून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविषयी घटनास्थळावरुन आणि नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी संकेश्वर मड्डी गल्ली कमतनूर वेस नजिक राहत असलेल्या श्रीमती शैलजा ऊर्फ गौरव्वा सुभेदार गौंडती (वय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta